एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मोदी' आडनावावरुन संजय राऊत आणि आशिष शेलारांमध्ये ट्विटरवॉर
मोदी आडनावाचे यमक जुळवून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. पण त्यांच्या या ट्वीटवर चिडलेल्या आशिष शेलारांनी तिखट भाषेत उत्तर दिले आहे.
मुंबई : नीरव मोदीनं देशाला 11 हजार कोटीचा चुना लावल्यानंतर 'मोदी' आडनावाला केंद्रस्थानी धरुन संजय राऊतांनी ट्विटरवरुन त्याची खिल्ली उडवली आहे. मोदी आडनावाचे यमक जुळवून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना ट्विटरवरुन टोला लगावला आहे. पण त्यांच्या या ट्वीटवर चिडलेल्या आशिष शेलारांनी तिखट भाषेत उत्तर दिलं आहे.
संजय राऊतांनी मोदी आडनावाला केंद्रस्थानी ठेऊन ट्वीट करताना म्हटलंय की, “पैसे बँकेत ठेवले तर नीरव मोदीची भीती आहे. तर घरात ठेवाले तर नरेंद्र मोदींची”पैसे बॅंक मे रखो तो नीरव मोदी का डर.. घर मे रखो तो नरेंद्र मोदी का..
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 15, 2018
"मोदी"या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य प्रभादेवीच्या गल्लीत बसून काहींना सूचले... तेव्हाच कळले आता "शिमगा" जवळ आलाय! तसा वर्षभरच यांचा शिमगाच असतो म्हणा!! उगाच "यमका" साठी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय,तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झाले!!! 😜😜@rautsanjay61 — ashish shelar (@ShelarAshish) February 17, 2018संजय राऊत यांच्या ट्वीटला आशिष शेलारांनी तिखट शब्दात उत्तर दिलं आहे. “प्रभादेवीच्या गल्लीत काहींना ‘मोदी’ शब्दाशी यमक जुळवून काहींना काव्य सुचले. तेव्हाच कळले की, शिमगा जवळ आला आहे. तसा वर्षभर यांचा शिमगाच असतो म्हणा. पण उगाच यमकासाठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू न,का ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल.” दरम्यान, भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले, हे दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नीरव मोदी प्रकरणावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. त्यात शिवसेनेचीही भर पडली आहे. दुसरीकडे शिवसेनेचं मुखपत्र आजच्या सामनातूनही नीरव मोदीलाचा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा खोचक सल्ला दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement