एक्स्प्लोर
आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाहीः तुकाराम मुंढे
नवी मुंबईः माझ्यावरच्या आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाही, असा दावा नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. आज नवी मुंबई महापालिकेत नगरसेवकांनी आयुक्त मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला. त्यानतंर मुंढेंनी आपली बाजू मांडली आहे.
आपण कुठल्याही राजकीय आरोपांना उत्तर देणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून काम करु, असं मुंढेंनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंढेंवर 105 विरुद्ध 6 असा अविश्वास ठराव मंजूर केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या अविश्वास ठरावाच्या बाजने मतदान केलं. तर भाजपने मुंढेंच्या बाजूने मतदान केलं.
आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात अविश्वास ठराव मंजूर
तुकाराम मुंढेंवरील आरोप आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. असं असलं तरी सर्वसामान्य मुंबईकर मात्र तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत.नवी मुंबईकरांनी मुंढेंना वाचवण्यासाठी ‘सेव्ह तुकाराम मुंढे’ मोहीम सुरु केली आहे. वाशी रेल्वे स्थानकाजवळ नवी मुंबईकरांनी एकत्रित येऊन ‘वॉक फॉर आयुक्त’ हे अभियान राबवलं गेलं. यावेळी ‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’ असे फलक हाती घेऊन, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे वादामध्ये कुणाची सरशी होणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल. पाहा व्हिडिओः संबंधित बातम्याःसुट्टीवर जाणार नाही, तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण
‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’; तुकाराम मुंढेंसाठी नवी मुंबईकर रस्त्यावर
तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेत दोन मतप्रवाह
आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव
…तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे
तुकाराम मुंढेंनी नवी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला!
नवी मुंबईकरांच्या समस्या जाणण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम
नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई
तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत धडक कारवाई, 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement