एक्स्प्लोर
माजी आमदाराला १ कोटी ७० लाख रुपयांचा गंडा!
कामोठे (पनवेल) : वशीला लावून सरकारी मंडळावर मोठं पद देण्याचं सांगून एका माजी आमदाराला कोट्यावधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय कांबळे यांना हा गंडा घालण्यात आला आहे. यासाठी कांबळे यांच्या मुलाकडून तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये उकळण्यात आले आहेत.
विजय कांबळे यांना आरोपी हृदयनाथ चव्हाण उर्फ चव्हाण महाराज यानां सरकारी मंडळावर वर्णी लावून देतो. माझी अनेक खासदार, आमदारांशी ओळख आहे. अशी बतावणी केली.
या भूलथापांना बळी पडून कांबळे यांनी १ कोटी २० लाख रुपये रोकड आणि ५० लाख रुपये चव्हाण महाराजच्या ट्रस्टच्या नावे चेकने दिले होते. मात्र, एक वर्ष झालं तरी काम काही झालं नाही. यामुळे आपली फसगत झाल्याचं कांबळे यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीनही मिळाला आहे. तर पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement