एक्स्प्लोर
‘जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपक्रम राबवणार’
‘आदिवासी तसेच ग्रामीण भागात अंधश्रध्देचे प्रमाण अधिक असून अशा ठिकाणी अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याविषयी जनजागृतीची आवश्यकता अधिक आहे.’
मुंबई : राज्यातील शाळा-महाविद्यालये, पंचायत समिती जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी, शिक्षक, पोलिस, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तंटामुक्ती सदस्यांसह आदिवासी, सांस्कृतीक, तसेच महिला बालविकास आदी विभागांमध्ये अंधश्रध्दा निर्मूलनाचे आणि जादूटोणा विरोधी प्रशिक्षण देण्यात येईल. अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजुकमार बडोले यांनी दिली.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीची आज बडोले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीनंतर बडोले पत्रकारांसोबत संवाद साधतांना म्हणाले की, ‘आदिवासी तसेच ग्रामीण भागात अंधश्रध्देचे प्रमाण अधिक असून अशा ठिकाणी अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याविषयी जनजागृतीची आवश्यकता अधिक आहे.’
अघोरी प्रथांना प्रतिबंध घालता यावा यासाठी सत्यमेव जयते सारख्या सिरीयल, शॉर्टफिल्म तयार करुन टीव्हीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement