एक्स्प्लोर
रेल्वे स्थानकात तिकीट बुकिंग क्लार्कची अधिकाऱ्याला मारहाण

मुंबई: डोंबिवलीजवळील कोपर रेल्वे स्थानकात बुकिंग क्लार्कनं अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री मुख्य वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता कोपर स्थानकात रात्री अचानक पाहाणीसाठी गेले. यावेळी बुकिंग ऑफिसमध्ये क्लार्क सतीश जोसेफ ऐवजी दुसराच माणूस तिकीट देण्यासाठी बसला होता. शिवाय आणखी एक अनोळखी व्यक्तीही तिथं होता. याबाबत विचारणा केल्यावर हे दोघं आपले मित्र असल्याचं जोसेफनं सांगितलं. मात्र, अशाप्रकारे बाहेरील व्यक्तीला तिकीट बुकिंग ऑफिसमध्ये प्रवेश नसल्यानं गुप्ता यांनी या दोघांनाही बाहेर काढलं. याचा जोसेफला राग आल्यानं त्याने गुप्ता यांना मारहाण केली. यात गुप्ता यांच्या डोळ्याला इजा झाली. यानंतर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी जोसेफवर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. तसंच रेल्वेनं त्याला निलंबितही केलं आहे.
आणखी वाचा























