एक्स्प्लोर
नवऱ्याची नोकरी गेली म्हणून लोकलमध्ये चोऱ्या
महिलांशी ओळख करताना ही तरुणी स्वतःचं नाव फक्त भालेराव इतकंच सांगत असल्यानं पोलिसांनी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागातल्या गॅस कनेक्शनची यादी मागवली आणि त्यात अंबरनाथमध्ये अशा वर्णनाची तरुणी पोलिसांना सापडली.
अंबरनाथ : लोकलमध्ये महिलांना गंडवून त्यांचे दागिने चोरणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचने अटक केली आहे. विशेष म्हणजे नवऱ्याची नोकरी गेल्याने आपण हे काम सुरु केल्याची धक्कादायक कबुली तिने दिली आहे. त्रिशला देविदास भालेराव उर्फ त्रिशला प्रतिक गायकवाड असं या तरुणीचं नाव आहे.
दागिने घालून लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांकडे आधी पिण्यासाठी पाणी मागून ती बोलणं सुरु करायची, मग महिलांनी दागिने सांभाळण्याची अनाउन्समेंट रेल्वेकडून केली जात असल्याची बतावणी करत महिलांना त्यांचे दागिने काढून पर्समध्ये ठेवायला ती सांगायची. काही वेळाने लोकलमध्ये गर्दी झाली, की संधी साधत हे दागिने चोरुन ती पसार व्हायची. अशाप्रकारे मागच्या तीन महिन्यांत अनेक चोऱ्यांच्या तक्रारी रेल्वे पोलिसांकडे आल्यानंतर कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचनं या तरुणीचा माग काढायला सुरुवात केली.
महिलांशी ओळख करताना ही तरुणी स्वतःचं नाव फक्त भालेराव इतकंच सांगत असल्यानं पोलिसांनी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागातल्या गॅस कनेक्शनची यादी मागवली आणि त्यात अंबरनाथमध्ये अशा वर्णनाची तरुणी पोलिसांना सापडली. ही तिच चोरटी असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अंबरनाथमधून तिला बेड्या ठोकल्या.
सध्या ती कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचच्या ताब्यात असून तिने चोरलेले साडेतीन लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी तिच्याकडून हस्तगत केलेत. अशाप्रकारे तिनं किती चोऱ्या केल्या? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement