एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई मेट्रो-3 साठी स्वतंत्र क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरीच नाही!
मुंबई मेट्रो लाईन 3 च्या कामामधील साहित्य आणि सर्व कामाची तपासणी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने नेमलेल्या सर्वसाधारण सल्लागारामार्फत करण्यात येते.
मुंबई : मुंबई मेट्रो-3 म्हणजे कुलाबा-सिप्झ मार्गावरील मेट्रोचं काम अत्यंत जोरात सुरु आहे. मात्र या कामादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेट्रो-3 ला स्वतंत्र क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरीच नसल्याची माहिती उघड झाली आहे.
मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत मुंबईत मुंबई मेट्रो 3 चे काम सुरु असून मुंबई मेट्रोची स्वतंत्र क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी नसल्याची धक्कादायक कबुली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. मुंबई मेट्रो लाईन 3 च्या कामामधील साहित्य आणि सर्व कामाची तपासणी सर्वसाधारण सल्लागारामार्फत करण्यात येते.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडकडे स्वतःची अशी क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी असल्यास त्याची माहिती विचारली होती. मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडचे जन माहिती अधिकारी आणि सल्लागार( समन्वय) श्रीनिवास नंदर्गीकर यांनी अनिल गलगली यांस कळविले की मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडची मेट्रोची स्वतंत्र क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी नाही.
मुंबई मेट्रो लाईन 3 च्या कामामधील साहित्य आणि सर्व कामाची तपासणी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने नेमलेल्या सर्वसाधारण सल्लागारामार्फत करण्यात येते. ज्या पद्धतीने प्रचंड रक्कम खर्च करत मुंबई मेट्रो लाईन 3 चे काम सुरु आहे. त्याचवेळी प्रत्येक साहित्य आणि सर्व कामाची तपासणी करण्यासाठी सर्वसाधारण सल्लागारामार्फत केल्या जाणाऱ्या तपासणीच्या गुणवत्तेवर मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन विसंबून राहत आहे.
स्वतंत्र अशी मुंबई मेट्रोची क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी सुरु करत एमएमआरडीए प्रशासनात सुद्धा अशाच प्रकाराची क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी सुरु करण्याची मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने तर जिल्हा स्तरावर अशा क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी बनविल्यात आहे. मग मेट्रोसारख्या प्रकल्पात अशी हलगर्जीपणा होण्याबाबत गलगली यांनी चिंता व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement