एक्स्प्लोर

coronavirus | मास्क, पीपीई किटवर आता अँटी वायरस नॅनो कोटिंगचा वापर होणार!; मुंबई विद्यापीठाच संशोधन

पीपीई किट आणि मास्कवर जमा होणारे विषाणू नष्ट करण्यासाठी विशिष्ट पॉलिमर्सची गरज भासते. त्याचबरोबर वैद्यकीय प्रमाणित पॉलिमर्सचाच यात वापर करणे गरजेचे होते. यात कोटींग्स तयार करण्यासाठी कोणत्याही घातक रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही.

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एकीकडे सर्वसामान्यांना संसर्गाचा धोका संभवतो, त्याचबरोबर कोरोना रुग्णांची सुश्रुशा करणाऱ्या वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ.विश्वनाथ पाटील आणि स्वच्छ उर्जा अलाएन्सचे डॉ. सुनील पेशणे व त्यांचा एक विद्यार्थी रोशन राणे यांनी एकत्र येऊन पीपीई किट आणि एन-95 मास्कवर जमा होणारे कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारीत अँटीव्हायरल कोटिंग्स तयार केली आहेत. विशिष्ट प्रकारच्या पॉलिमर्समध्ये नॅनो पार्टीकल्स बनवून त्याची कोटींग तयार करण्यात आली आहेत.

पीपीई किट आणि मास्कवर जमा होणारे विषाणू नष्ट करण्यासाठी विशिष्ट पॉलिमर्सची गरज भासते. त्याचबरोबर वैद्यकीय प्रमाणित पॉलिमर्सचाच यात वापर करणे गरजेचे होते. यात कोटींग्स तयार करण्यासाठी कोणत्याही घातक रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही. विशेष बाब म्हणजे ही कोटिंग्स अवघ्या चार तासात तयार केली जाऊ शकतात व ती पंधरा मिनीटात वापरात देखील आणली जाऊ शकतात असे निरीक्षणात दिसून आले आहे.

विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या या अँटीव्हायरल कोटिंग्सची पीपीई कीट आणि एन-95 मास्कच्या पॉलिमर्सवर याची प्राथमिक चाचणी सुद्धा करण्यात आली आहे. या कोटिंग्सची कोरोना विषाणूंना मारण्याची क्षमता यावर लवकरात लवकर चाचण्या घेण्यात याव्यात यासाठी दोन्ही संशोधक प्रयत्नशील आहेत. देशातील एकमेव बीएसल 3/4 पातळीच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरालॉजी ( National Institute of Virology) पुणे येथे ही कोटिंग्स तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे हा प्रकल्प डीएसटीला नुकताच सादर करण्यात आला आहे.

“कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचावात्मक उपाययोजना करण्यासाठी आणि या संकटकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याच शैक्षणिक उपक्रमातील हा एक टप्पा आहे. शैक्षणिक क्षेत्रातून जेवढी भरीव मदत करता येईल त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.” असं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थितीZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaZero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP MajhaZero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Embed widget