एक्स्प्लोर
कोरोनाला रोखण्यासाठी DRDOने तयार केला ‘डिसइंफेक्शन टॉवर’; सार्वजनिक ठिकाणी होणार वापर
मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, विमानतळ, शाळा आणि मेट्रो स्टेशन यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 'यूव्ही-बलॉस्टर' खूप मदत करु शकतो.
नवी दिल्ली : संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्यावतीने (डीआरडीओ) सार्वजनिक ठिकाणांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे करण्यासाठी नवीन यंत्रे विकसित करण्यात आलं आहे. मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, विमानतळ, शाळा आणि मेट्रो स्टेशन यांसारखी सार्वजनिक ठिकाणं कोरोना व्हायरसपासून निर्जंतुकीकरण करण्यासाठी डीआरडीओने अल्ट्रा व्हायलेट तंत्रज्ञानाने चालणारा एका डिसइंफेक्शन टॉवर (निर्जंतुकीकरण टॉवर) तयार केला आहे. वाय-फायवर चालणारा हा टॉवर अर्ध्या तासात 400 चौरस फूट क्षेत्र निर्जंतुकीकरण करु शकतो.
संरक्षण मंत्रालयच्या माहितीनुसार कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असलेल्या कोणत्याही मोठ्या क्षेत्रात केमिकलचा वापर टाळायचा असल्यास हे 'यूव्ही -बलॉस्टर' खूप प्रभावी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या यूव्ही (अल्ट्रा व्हायलेट) बलॉस्टरला मोबाईल किंवा लॅपटॉप वरून वायफायद्वारे दूरुन देखील हाताळता येऊ शकतं. या मशीनला सहा यूव्ही-सी लॅम्प लावले आहेत. प्रत्येक लॅम्प 43 वोल्ट्सचा असून 360 डिग्री प्रकाश देतो. एक मशीन 12x12 फूट रुमला 10 मिनिटांत कोरोना विषाणूमुक्त करु शकते असा दावा डीआरडीओने केला आहे.
या डिसइंफेक्शन टॉवर (निर्जंतुकीकरण टॉवर) ला संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्यावतीने (डीआरडीओ) गुरुग्राम येथील एका खासगी कंपनीच्या मदतीने तयार केलं आहे.
मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, विमानतळ, शाळा आणि मेट्रो स्टेशन यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 'यूव्ही-बलॉस्टर' खूप मदत करु शकतो. तसेच कम्प्युटर आणि इतर हाय-टेक उपकरणं असलेली कार्यालयं आणि लॅब अशा ठिकाणी देखील या टॉवरचा उपयोग केला जाऊ शकतो.
Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट
देशभरात 27.52 टक्के रुग्ण कोरोनामुक्त; गेल्या 24 तासात 1074 रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून आज 42 हजार 533 वर पोहोचली आहे. यापैकी 29 हजार 453 अॅक्टिव्ह केसेस आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 11000 पेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. एकूण 11707 रूग्ण बरे झाले आहेत आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 27.52 टक्के आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, गेल्या 24 तासात 1074 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत आणि 2553 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना व्हायरस सारखे साथीचे आजार क्वचितच आढळून येतात. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं योग्य पालन झालं नाही तर, कोरोना व्हायरसच्या संसर्ग आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement