एक्स्प्लोर

गुडन्यूज... मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर 1 टक्क्यापेक्षाही कमी

कोविड-19 च्या संसर्गाच्या प्रारंभापासून अधिकाधिक चाचण्या म्हणजे, खंबीरपणे संसर्गावर नियंत्रण, ही बाब केंद्रस्थानी ठेवून महानगरपालिका प्रशासनाने कोरोना चाचण्यांची संख्या सातत्याने वाढवण्यावर भर दिला आहे.

मुंबई : मंबईसाठी कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. काल एकाच दिवशी वेगवेगळ्या निकषांमध्ये मुंबईने मोलाचे टप्पे गाठले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1 टक्क्यापेक्षाही कमी झाला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवसांच्या पार गेला आहे. एवढेच नव्हे तर, मुंबईत कोरोनाची लागण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांनी 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे दिनांक 28 जुलै 2020 रोजी एकाच दिवसात 11 हजार 643 चाचण्या करण्यात आल्या असून हा मुंबईतील एका दिवसातील चाचण्यांचा आतापर्यंतचा उच्चांकदेखील आहे.

कोविड-19 च्या संसर्गाच्या प्रारंभापासून अधिकाधिक चाचण्या म्हणजे, खंबीरपणे संसर्गावर नियंत्रण, ही बाब केंद्रस्थानी ठेवून महानगरपालिका प्रशासनाने कोरोना चाचण्यांची संख्या सातत्याने वाढवण्यावर भर दिला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करुन प्रशासनाने चाचण्या केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ : मुंबईची वाटचाल हर्ड इम्युनिटीकडे; सेरो सर्वेक्षणाची पहिली फेरी पूर्ण

दिनांक 3 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. प्रारंभी 3 फेब्रुवारी ते 6 मे 2020 या कालावधीमध्ये मुंबईत 1 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. नंतर 1 जून 2020 रोजी 2 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. म्हणजेच 1 लाख ते 2 लाख हा टप्पा गाठण्यासाठी 25 दिवस लागले. त्यानंतर दिनांक 24 जून 2020 रोजी 3 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. म्हणजे 2 लाख ते 3 लाख हा टप्पा 23 दिवसांत गाठला गेला. तर दिनांक 14 जुलै 2020 रोजी 4 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. 3 लाख ते 4 लाख चाचण्या हा टप्पा 20 दिवसांत पार पडला.

काल म्हणजेच, दिनांक 29 जुलै रोजी 5 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला असून 4 लाख ते 5 लाख चाचण्यांचा टप्पा अवघ्या 15 दिवसांमध्ये गाठण्यात आला आहे. यातून निदर्शनास येते की, चाचण्यांचे हे लाखा-लाखांचे टप्पे गाठताना त्यातील दिवसांचे अंतर सातत्याने कमी होत आहे, याचाच अर्थ दैनंदिन सरासरी चाचण्यांचा वेग वाढला आहे, त्याची सरासरी वाढली आहे.

विशेष म्हणजे 28 जुलैच्या 24 तासांमध्ये तब्बल 11 हजार 643 चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एका दिवसांत करण्यात आलेल्या चाचण्‍यांचा हा उच्चांक आहे. तत्पूर्वी 27 जुलै 2020 रोजीच्या 24 तासांमध्ये देखील 8 हजार 776 चाचण्या करण्यात आल्या होत्या. पूर्वीच्या दैनंदिन सरासरी चाचण्यांच्या तुलनेत हा वेग आता दुप्पटीपेक्षा अधिक झाला आहे.

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. मुंबईतील 24 प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण 18 म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये 1 टक्के किंवा त्यापेक्षा कमी रुग्णवाढ दर आहे.

मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता 72 दिवसांचा झाला आहे. यातही विशेष म्हणजे, मुंबईतील 24 प्रशासकीय विभागांपैकी 14 विभागांमध्ये रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी हा 72 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यातही चार विभाग 90 दिवसांपेक्षा अधिक तर दोन विभाग 100 दिवसांपेक्षा अधिक दिवसांची सरासरी राखून आहेत. रुग्ण दुप्पट होण्यासाठी अधिक कालावधी म्हणजे संसर्गाचा फैलाव तितकाच मंदावला, असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधीदेखील सातत्याने वाढता असून संसर्गावर नियंत्रण मिळाल्याचे ते द्योतक आहे.

मुंबईत एकीकडे दैनंदिन चाचण्यांची संख्या, त्याची सरासरी वाढली असली तरी नवीन रुग्ण आढळण्याची सरासरीदेखील पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे. सोबतच प्रभावी उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या दुहेरी कामगिरीमुळे उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता कमी होऊ लागली आहे.

आजपर्यंत मुंबईत 1 लाख 10 हजार 846 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 83 हजार 097 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर सध्या एकूण 17 हजार 862 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच, सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता 18 हजारांपेक्षाही कमी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

झोपडपट्ट्यांमधील सरासरी 57 टक्के लोकांची प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात : सेरो सर्व्हे

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! तीन महिन्यातील सर्वांत कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत 30 गतीमंद मुलांना कोरोनाची लागण; मुलांना कोरोना कसा झाला? खासदार राहुल शेवाळेंची चौकशीची मागणी

मुंबईत अवघ्या 30 लाखांत घर मिळणार, ठाकरे सरकारची खास योजना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
×
Embed widget