एक्स्प्लोर

झोपडपट्ट्यांमधील सरासरी 57 टक्के लोकांची प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात : सेरो सर्व्हे

झोपडपट्टीवासीयांना इतर भागातील रहिवाशांच्या तुलनेत कोरोनाची लागण जास्त झाली आहे. सोबतच, कोरोनाला परतवून लावणाऱ्या अॅन्टिबॉडीजही झोपडपट्टीवासियांमध्येच अधिक आढळून आल्या आहेत.

मुंबई : मुंबईतील सेरो सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीच्या अहवालाचा निष्कर्ष आला असून मुंबईमध्ये ऍन्‍टीबॉडीजच्या सेरो सर्वेक्षणाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. दुसरी फेरी ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे. नीती आयोग, मुंबई महानगरपालिका, टीआयएफआर यांच्‍याकडून पह‍िल्‍या फेरीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार दाटीवाटीच्या भागात राहुनही मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांनी प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोनाला परतवलं असल्याचं निष्पन्न झालं आहे. मुंबईच्या सेरो सर्वेक्षण केलेल्या झोपडपट्टयांमधील सरासरी सुमारे 57 टक्के झोपडपट्टीवासियांमध्ये कोरोनाच्या अॅन्‍टीबॉडीज सापडल्या आहेत. तर, बिगर झोपडपट्टी म्हणजेच, इतर रहिवासी भागांमधील रहिवाशांमध्ये सुमारे 16 टक्के अॅन्‍टीबॉडीज आढळून आल्या आहेत.

झोपडपट्टीवासीयांना इतर भागातील रहिवाशांच्या तुलनेत कोरोनाची लागण जास्त झाली आहे. सोबतच, कोरोनाला परतवून लावणाऱ्या अॅन्टिबॉडीजही झोपडपट्टीवासियांमध्येच अधिक आढळून आल्या आहेत. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये निर्माण झालेल्या अॅन्टिबॉडीजचं प्रमाण किंचीत अधिक आहे. मात्र, सर्व वयोगटांमध्ये अॅन्टिबॉडीजचं समान प्राबल्य दिसून आलं. पहिल्या टप्प्यातील हे सर्वेक्षण हर्ड इम्युनिटीच्या अभ्यासासाठी पूरक ठरणार आहे. मात्र, हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी किती प्रमाणात अॅन्टिबॉडीज सापडल्या पाहिजेत हे अद्याप अनिश्चित आहे. मोठ्या लोकसंख्येत अॅन्टिबॉडीजचे प्रमाण टिकून राहिले, तर मुंबईची हर्ड इम्युनिटीच्या मार्गानं वाटचाल सुरु होऊ शकते, असा अंदाज वर्वण्यात येत आहे.

कोरोनाचा वेग कमी करण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग आणि मास्क लावणे या उपाययोजना न्यू नॉर्मल हॅबीट म्हणून स्वीकारल्या गेल्या पाहिजेत असे सर्वेक्षण सांगते. म्हणजेच इथून पुढे मुंबईत मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंग हा दैनंदिन जीवनाचा भाग असेल. सेरो सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीत एकूण 6 हजार 936 नमुने संकलित करण्यात आले. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले.

पाहा व्हिडीओ : मुंबईत सेरो सर्वेक्षणात सरासरी 57% झोपडपट्टीवासियांमध्ये अॅंटीबॉडीज मिळाल्या

काय आहे सेरो सर्वेक्षण?

मुंबईमध्ये सार्स-कोविड-2 संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन केलेले सर्वेक्षण म्हणजेच सेरो सर्वेक्षण. सेरोलॉजिकल सर्वेलन्साचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांनी संयुक्तरित्या सुरु केला होता. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्‍त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान (Translational Health Science and Technology Institute), ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हेदेखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी होते.

भारतातील एक व्यापक अवछेदी सर्वेक्षण (क्रॉस-सेक्शनल सर्वे) म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्‍ट नागरिकांमध्‍ये असलेल्या रक्‍तातील प्रतिद्रव्‍य (ऍन्‍टीबॉडीज) चे प्राबल्य जाणून घेणे हे होते. त्यासाठी यादृच्छिक पद्धती (Random Sampling) ने नमुने संकलित करण्यात आले. त्यात सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या साथआजाराचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्‍यास करण्‍यासाठी दोन फेऱ्यांमधून सर्वेक्षण घेण्‍याचे निश्चित करण्यात आले होते.

पहिल्या फेरीमध्ये अंदाजित केलेल्या 8 हजार 870 पैकी एकूण 6 हजार 936 नमुने संकलित करण्यात आले. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींची स्वच्छेने संमती प्राप्त करून त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! तीन महिन्यातील सर्वांत कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

सर्वसाधारण लोकसंख्येतील अभ्यासातून आढळून आलेल्या मुख्य बाबी :

या सर्वेक्षण अभ्यासाचा कालावधी हा जुलै 2020 या महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील 12 ते 14 दिवसांचा होता. सर्वेक्षणामध्ये निर्धारित लक्ष्यापैकी झोपडपट्टी भागातून 100 टक्के तर बिगर झोपडपट्टी भागातून सरासरी 70 टक्के प्रतिनिधी सहभागी झाले.

1. संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 57 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 16 टक्के याप्रमाणे या रक्‍तातील प्रतिद्रव्‍य (ऍन्‍टीबॉडीज) चे प्राबल्य आढळून आले आहे.

2. असे अॅन्‍टीबॉडीज प्राबल्य महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले असले तरी या तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले आहे.

सर्वेक्षणातून समोर आलेले निष्कर्ष :

सर्वेक्षणाचे परिणाम असे दर्शवतात की, एकूण संसर्गाच्या प्रमाणापैकी लक्षणे नसलेल्या बाधितांचे (एसिम्प्टोमॅटिक) प्रमाण हे जास्त असू शकते.

झोपडपट्टी परिसरांमध्ये जास्त प्राबल्य आढळून येण्याचे कारण लोकसंख्येची घनता आणि सामुदायिक सुविधा (जसे की- शौचालये, पाण्याची स्थळे) वापरणे हे देखील असू शकते.

याठिकाणी सध्याचे प्राबल्य (अनुमानित) आणि महानगरपालिकेकडे नोंद असलेली मृत्यू प्रकरणे यांचा एकत्रित विचार केला असता, संसर्ग मृत्यू दर (Infection Fatality Rate-IFR) हा अतिशय कमी (0.05-0.10%) असण्याची शक्यता आहे. संसर्ग रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेले प्रभावी प्रतिबंधात्मक प्रयत्न व लक्षणे दिसत असलेल्या बाधितांना (Symptomatic) विलगीकरण करण्यासाठी केलेल्या कार्यक्षम उपाययोजना यामुळे देखील हे शक्य झाल्याचे सांगता येईल.

बिगर झोपडपट्टी भागांमध्ये तुलनेने अधिक चांगले असलेले सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेमुळे व त्या सोबतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे देखील प्राबल्य कमी आढळले आहे.

सामूहिक प्रतिरोधक शक्ती (हर्ड इम्यूनिटी) संदर्भात अधिक अभ्यास करण्यासाठी शोधलेले सदर परिणाम महत्त्वाचे ठरतील. सामूहिक प्रतिरोधक शक्ती तयार होण्यासाठी कुठल्या पातळीपर्यंत प्राबल्य असले पाहिजे, हे अद्यापही अनिश्चित असले तरी, हे निष्कर्ष दर्शवतात की, जर लोकसंख्येच्या मोठ्या हिश्श्यामध्ये प्रतिरोधक शक्ती अस्तित्वात असेल आणि टिकून असेल तर निदान झोपडपट्ट्यांमध्ये तरी लवकरच हे कळून येईल.

सारांश रुपात, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या नोंदींच्या आधारे, सर्वेक्षण केलेल्या तीनही विभागांमध्ये रुग्णप्रकरण मृत्यू दर (case fatality rate) (सुमारे ५-6 टक्के) याच्या तुलनेत संसर्ग मृत्यू दर (Infection Fatality Rate-IFR) हा कमी (0.05-0.10%) असू शकते.

एकत्रितपणे, असे सुचवता येते की, संसर्गाच्या फैलावाचा वेग कमी होण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे आणि मुखावरण (मास्क) लावणे इत्यादी तत्सम उपाययोजना प्रभावी आहे. त्यामुळे या उपाययोजना समाजाच्या सर्व स्तरांमध्ये नवीन नित्याच्या बाबी (न्यू नॉर्मल) म्हणून स्वीकारल्या गेल्या पाहिजेत.

येत्‍या काळाचा विचार करता, सध्याचा अभ्यास/विश्लेषण हे (अ) न्यूट्रलायझिंग ऍन्‍टीबॉडीज, (ब) सार्स कोविड 2 संसर्गातील धोक्याचे घटक याबाबतची माहिती देईल. सर्वेक्षणाच्या पुढील नियोजित फेऱ्यांमधून झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी भागांमधील संसर्गाच्या फैलावाची माहिती मिळू शकेल तसेच सामूहिक प्रतिरोधक शक्ती (हर्ड इम्युनिटी) बाबतदेखील स्थिती कळू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या : 

मुंबईत अवघ्या 30 लाखांत घर मिळणार, ठाकरे सरकारची खास योजना

इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप कोरोना काळात ठरणार वरदान, वाशिमच्या प्राध्यापकाचं संशोधन

पोलिसांना मिळणार 4500 घरे, सोमवारपासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget