मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आज तीन महिन्यातील सर्वांत कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
सोमवारी मुंबईत गेल्या 10 दिवसांमधील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज सर्वाधिक 8776 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
![मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आज तीन महिन्यातील सर्वांत कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद corona update, major relief to mumbaikars, Only 700 cases today in Mumbai मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आज तीन महिन्यातील सर्वांत कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/29004836/BMC.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 24 तासांत तीन महिन्यातील सर्वांत कमी रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या आजाराचा सर्वाधिक फैलाव मुंबईतच झाला होता. मात्र सुरुवातील झालेल्या प्रचंड वाढीनंतर आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने कमी झाली आहे. सोमवारी मुंबईत गेल्या 10 दिवसांमधील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज सर्वाधिक 8776 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी मुंबईमध्ये केवळ 700 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. निराश होऊ नका, मास्क काढू नका, केवळ नंबर कमी होऊ द्या, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
The good news: Only 700 cases today in Mumbai & that too with highest testing till date in Mumbai in a single day(8776).This is chase the virus in full capacity. A major relief after 3 months. Caution: don’t let the guard down! Don’t let your mask down! Only get numbers down!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 28, 2020
मुंबई महापालिकेकडून चेस द व्हायरस मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ही मोहिम संपूर्ण महाराष्ट्रातही लागू केली जाणार आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सुरुवातीला झपाट्याने वाढत होती. मात्र बीएमसीच्या अभियानानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
राज्यात आज 7 हजार 717 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 10 हजार 333 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 32 हजार 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज 282 रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या 1 लाख 44 हजार 694 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Nagpur Covaxin | भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीला नागपुरात सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)