ठाणे-मुंब्रा बायपास रोड उद्यापासून सुरु होणार
ठाणे-मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील या मार्गाचं उद्या उद्घाटन करणार आहेत.
ठाणे : गेल्या चार महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला ठाणे-मुंब्रा बायपास रोड अखेर उद्या सुरु होणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील या मार्गाचं उद्या उद्घाटन करणार आहेत.
मागील 8 मेपासून हा मार्ग दुरुस्तीसाठी पूर्णपणे बंद होता. या कामामुळे ठाणे तसेच नवी मुंबईदरम्यानच्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले होते. जड वाहतूक ऐरोली आणि कल्याणमार्गे वळवल्याने सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. आता हा मार्ग सुरु झाल्यावर वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका होणार आहे.
वाहतूक कोंडीने मनस्ताप
मुंब्रा बायपासचं काम सुरु झाल्यापासून वाहनचालक वाहनकोंडीने वैतागले होते. ठाणे आणि ऐरोली मार्गावरील टोलनाक्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. टोननाक्यांवरील वाहतूक कोडींच्या पार्श्वभूमीवर ऐरोली आणि मुंलुंड टोलनाक्यांवरील टोलवसुली बंद करण्यात आली होती.
मुंब्रा बायपास पूर्णपणे बंद असल्याने वाहतुकीचा ताण ऐरोली, शिळफाटा मार्गावर पडत होता. उरणमधील जेएनपीटी बंदरातून नाशिक आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहनं मुंब्रा बायपास मार्गाचा वापर करतात, मात्र हा रस्ता धोकादायक झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या आधीच वाहतूक कोंडी, त्यात टोलवसुली; वाहनचालक त्रस्त मुंब्रा बायपास रोडच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळाला, वाहतुकीत बदल ठाणे: मुंब्रा बायपास दुरुस्तीच्या कामामुळे ट्रॅफिक जॅम मुंब्रा-बायपास 16 एप्रिलपासून दोन महिने बंद मुंब्रा बायपासचं काम सुरु, मात्र पर्यायी ऐरोली, शिळफाटा मार्गावर कोंडी