एक्स्प्लोर
ठाणे-मीरा रोड बसचा अपघात, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

ठाणे : मीरा रोडवरुन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या टीएमटी बसचा घोडबंदर रोडवरील चेन्ना ब्रिजजवळ अपघात झाला. ठाणे-मीरारोड मार्गावर धावणाऱ्या 57 क्रमांकाच्या बसचा हा अपघात झाला. अचानक आलेल्या पावसामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या डावीकडे कलंडली. आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. सुदैवाने प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र, बसचालकाला दुखापत झाली असून, त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. सुदैवाने प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र, बसचालकाला दुखापत झाली असून, त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आणखी वाचा























