एक्स्प्लोर
Advertisement
3 वर्ष 3 दिवसात 35 देश आणि 4 खंड पालथे, ठाण्यातील पत्रकार जगभ्रमंती
कोणतेही प्लॅनिंग न करता, जसा मिळेल तसा प्रवास करुन, अनोळखी लोकांकडून लिफ्ट मागत, त्यांच्या घरी राहून, प्रसंगी रस्त्यावर किंवा स्टेशनवर राहून त्यांनी हे दिवस काढले.
ठाणे : 3 वर्ष 3 दिवस जगाला गोल चक्कर मारुन ठाण्यातील एक पत्रकार ठाण्यात परतला आहे. या 3 वर्षात त्याने 35 देश आणि 4 खंड पालथे घातले. विष्णुदास चापके असं त्याचं नाव असून तो काल (21 मार्च) रोजी ठाण्यात परतला.
या जगाच्या सफरीमुळे तो भारतीय मार्को पोलो झाला आहे, असंच म्हणावं लागेल. कारण कोणतेही प्लॅनिंग न करता, जसा मिळेल तसा प्रवास करुन, अनोळखी लोकांकडून लिफ्ट मागत, त्यांच्या घरी राहून, प्रसंगी रस्त्यावर किंवा स्टेशनवर राहून त्यांनी हे दिवस काढले.
या प्रवासासाठी त्याने मुंबईतील घरासाठी जमवलेले सर्व पैसे खर्च केले. वडिलांनी गावची जमीन विकायला काढली तर मित्रांनीही पैसे जमवून त्याला मदत केली. शेवटी टाटा ट्रस्टने त्याच्या उर्वरित सर्व प्रवासाचा खर्च उचलला. त्यामुळेच तो जग भ्रमंती करुन आज पुन्हा भारतात येऊ शकला.
अमेरिकेने शेवटपर्यंत व्हिसा न देणे, बॅग चोरीला जाणे, लॅपटॉप मोबाईल चोरीला जाणे असे अनेक प्रसंग, अडचणी त्याच्या ध्येयाच्या आड आल्या. मात्र त्याने न जुमानता प्रवास सुरु ठेवला. अखेर काल तो घरी परतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement