एक्स्प्लोर
सीडीआर प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अखेर बेड्या
ठाणे गुन्हे शाखेने मुख्य सूत्रधार सौरव साहू याला दिल्लीतून बेड्या ठोकल्या. पोलिसांकडून आता सौरव साहूची कसून चौकशी केली जात आहे.

ठाणे : सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश आलं आहे. ठाणे गुन्हे शाखेने मुख्य सूत्रधार सौरव साहू याला दिल्लीतून बेड्या ठोकल्या. पोलिसांकडून आता सौरव साहूची कसून चौकशी केली जात आहे. अवैधपणे एखाद्या व्यक्तीचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स काढणं हा भारतात गुन्हा मानला जातो. मात्र तरीही अशा प्रकारे एखाद्यावर पाळत ठेवण्यासाठी कुणाचेही सीडीआर काढले जात असल्याचा प्रकार ठाणे गुन्हे शाखेने उघड केला होता. या सगळ्या प्रकरणात आत्तापर्यंत खासगी गुप्तहेर रजनी पंडित, हायप्रोफाईल अॅडव्होकेट रिझवान सिद्दीकी यांच्यासह 15 जणांना अटक करण्यात आली होती. तर नुकतीच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमास सिद्दीकी याचीही चौकशी करण्यात आली. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यावर सौरव हाच या सगळ्याचा सूत्रधार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार ठाणे गुन्हे शाखेने रविवारी सौरवला दिल्लीतून अटक केली. सौरवला यापूर्वी 2015 मध्ये दिल्ली क्राईम ब्रँच, तर 2017 मध्ये मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली होती. त्यानंतर ठाणे क्राईम ब्रँचनेही त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याने आत्तापर्यंत कुणाकुणाचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स काढले, याची ठाणे गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. सीडीआर प्रकरणात आतापर्यंत कुणाकुणाला अटक?
- माकेश पांडियन
- प्रशांत पालेकर
- जिगर मकवाना
- समरेश झा उर्फ प्रतीक मोहपाल
- प्रशांत सोनावणे
- संतोष पंडागळे
- रजनी पंडित
- अजिंक्य नागरगोजे
- जसप्रितसिंग मारवा
- किर्तेश कवी
- नितीन खवडे
- रिझवान सिद्दीकी
- जिग्नेश छेडा
- लक्ष्मण ठाकूर
- पंकज तिवारी
- सौरव साहू
सीडीआर लीक : अभिनेत्री उदिता गोस्वामीची 3 तास चौकशी
CDR प्रकरण: अॅड. सिद्दीकींच्या अटकेवरुन कोर्टाने पोलिसांना झापलं!
सीडीआर प्रकरण: कंगणासह, आयशा श्रॉफचं नाव!सीडीआर प्रकरण : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलांना अटक
नवाझवरील सीडीआर हेरगिरीच्या आरोपावर पत्नी आलिया म्हणते...
ठाण्यातील सीडीआर प्रकरणात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचं नाव
सीडीआर लीक रॅकेटमध्ये पोलिसांचाही सहभाग
CDR लीक प्रकरण : व्हीआयपी नंबर समोर, ब्लॅकमेलिंगचा संशय
CDR लीक प्रकरण : व्होडाफोनसह 7 मोबाईल कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात
आणखी वाचा























