एक्स्प्लोर
दहीहंडी : हा विश्वास आहे, पण जिवाशी खेळ नको!
ताडदेव इथे दहीहंडी फोडल्यानंतर सर्वात वरच्या थरावरील गोविंदा वरच अडकून राहिला आणि त्याला इतर गोविंदांनी खाली झेललं.

मुंबई: दहीहंडीवरील बंदी उठवल्यानंतर सर्वत्र गोविंदांचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचून हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाले आहेत. मुंबईतील ताडदेवमधील गोपलकृष्ण क्रीडा मंडळानेही दिमाखात दहीहंडी साजरी केली. पण दहीहंडी फोडल्यानंतर सर्वात वरच्या थरावरील गोविंदा वरच अडकून राहिला आणि त्याला इतर गोविंदांनी खाली झेललं. गोविंदा आत्मविश्वासाने जास्तीत जास्त थर लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा वेळी विश्वासासोबतच जीवाची काळजी घेणंही गरजेचं आहे. पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा























