कोरोनाबाधित 85 टक्के लोकांमध्ये लक्षणं आढळली नाहीत; आरोग्य विभागाच्या अहवालातून धक्कादायक माहिती
आरोग्य विभागातील माहितीच्या विश्लेषणातून धक्कादायक बाब समोर आली आहे. यातील 85 टक्के केसेसमध्ये कोणतीच लक्षणं आढळली नाही.
मुंबई : कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्हांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. आताच्या घडीला राज्यात 338 लोक कोरोना संक्रमित आहेत. या संदर्भात दररोज आरोग्य विभागातर्फे अहवाल सादर केला जातो. या अहवालाचे विश्लेषण केले असता काही निष्कर्ष समोर आले आहे. यात तरुण वयोगटातील रुग्ण अधिक असल्याचे समोर आलयं. तर, मृतांमध्ये वृद्धांचा अधिक समावेश असल्याचं पाहायला मिळालं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्यात लॉकडाऊन आहे. मात्र, तरीही लोक गर्दी करताना पाहायला मिळत असल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग आता वेगाने होताना दिसत आहे. कारण, गेल्या 24 तासांत राज्यात 100 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. त्यामुळे आरोग्य विभाग आणखी सतर्क झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स हा योग्य पर्याय मानला जातो. मात्र, राज्यातील अनेक ठिकाणी गर्दी काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. दरम्यान, आरोग्य विभागाच्या अहवालातील माहितीचे विश्लेषण केले असता काही बाबी समोर आल्या आहेत.
वयोगटानुसार बाधित वयोगट संख्या
- 21 ते 31 वयोगट 63
- 31 ते 40 वयोगट 67
- 41 ते 50 वयोगटातील 68, असे 21 ते 50 या वयोगटातले 198 म्हणजे एकूण बाधितांच्या संख्येत 60 टक्क्यांहून अधिक तरुण वयोगट.
- 51 ते 60 वयोगटातले 41
- एकूण 322 बाधित रुग्णांपैकी 62 टक्के पुरुष बाधित. त्यातल्या 83 केसेस ना आपणाला कोणापासून बाधा झाली आहे हे सांगता आलेलं नाही.
- 147 केसेसच्या थेट लोकांच्या संपर्कात आलेल्या आहेत. एकूण केसेसपैकी 85 टक्के केसेसमध्ये लक्षणं आढळून आली नाही.
- 11 टक्के केसेसमध्ये क्रिटिकल लक्षणे. चार टक्के केसेसमध्ये एकूण नऊ बाधीत हे क्रिटिकल अवस्थेत आहेत.
राज्यात आरोग्य विभागाच्या हालचालींना वेग कोरोना बाधितांचा आकडा वेगाने वाढत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणाच्या हालचालींना वेग आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे. अशां व्यक्तींना लगेच क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. दरम्यान, दिल्लीतील निजामुद्दीनला तब्लिग जमातच्या कार्यक्रमाला राज्यातील विविध जिल्ह्यातू जवळपास 1400 लोक गेली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंता वाढल्या होत्या. त्यापैकी 1300 लोकांना क्वॉरंटाईन करण्याचं काम सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सध्या पाच हजार चाचणींची क्षमता आहे. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यात मिळालेली आहे. त्यामुळे प्राथमिक चाचणीतच प्रादूर्भाव आहे का ते कळेल. तसेच ब्लड घेतल्यावर केवळ 5 मिनिटात कोरोना आहे की नाही असे समजणारीही रॅपिड टेस्ट आहे,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले.
Lockdown | लॉकडाऊन वन्यजीवांच्या पथ्यावर, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांचा मुक्तसंचार