एक्स्प्लोर
Nalasopara News : नालासोपाऱ्यातील सात बेकायदा इमारतींवर बुलडोझर, 50 हून अधिक कुटुंब बेघर; 30 एकर जागेवरील घरे भुईसपाट होणार
Nalasopara Demolition : नालासोपाऱ्यात 30 एकर जागेवरील बेकायदेशीर इमारतींवर बुलडोझर फिरणार असून न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदेशीर अग्रवाल नगरीतील घरे भुईसपाट होणार आहेत.
Nalasopara Demolition
1/11

नालासोपारा येथे 30 एकर जागेवर उभारलेले बेकायदेशीर अग्रवाल नगर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भुईसपाट करण्यात आलं
2/11

एक घर बांधण्यात माणसाला उभं आयुष्य मेहनत करावी लागते, पण जेव्हा तेच घर आपल्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होतं, तेव्हा ते घर बांधणाऱ्याच्या मनावर काय आघात होत असेल, हे कुणीच सांगू शकतं.
3/11

असाच प्रकार नालासोपारा पूर्व अग्रवाल शहरात पाहायला मिळाला. नालासोपाऱ्यातील अवैध अग्रवाल शहरावर बुलडोझरचा चालवत तोडक कारवाई करण्यात आली.
4/11

नालासोपारा पूर्व अग्रवाल शहरातील डम्पिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लांटच्या आरक्षित जागेवर बांधलेल्या 41 बेकायदा इमारतींवर तोडक कारवाई होणार आहे. गुरुवारी सकाळी सात इमारतींवर महापालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आला.
5/11

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ही तोडक कारवाई करण्यात आली. पहिल्याच दिवशी सात इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. यावेळी महापालिकेचे 50 हून अधिक अधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
6/11

पालिकेच्या तोडक कारवाईदरम्यान, काही लोकांना त्यांचे घर सोडण्यास तयार नव्हते, यावेळी पोलिस दल आणि सुरक्षा रक्षकांनी स्थानिकांना घराबाहेर आणलं.
7/11

यावेळी स्थानिकांनी विरोधही केला, मात्र प्रशासनासमोर ते हतबल झाल्याचं दिसून आलं.
8/11

लोक रडत-रडत घराबाहेर पडले आणि सामान गोळा करत डोळ्यांसमोर त्यांची घरे जमीनदोस्त झालेली पाहत होते.
9/11

पहिल्या दिवसाच्या कारवाईत 50 हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत.
10/11

image 10
11/11

image 11
Published at : 29 Nov 2024 03:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























