एक्स्प्लोर
ट्रॅकवरुन आधी मशिन जाईल, मग ट्रेन: रेल्वेमंत्री
मुंबई: सध्या ट्रॅकवर आडवे खांब, दगड ठेवून घातपाताचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून शक्य ते उपाययोजना केली जात आहे. सुरक्षेसाठी रेल्वेच्या आधी ट्रॅकवरुन एखादं यंत्र जाईल, अशी यंत्रणा तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं.
सुरेश प्रभू यांनी विविध मुद्द्यांवर 'माझा कट्टा'वर दिलखुलास गप्पा मारल्या.
गेल्या काही दिवसांत रेल्वे अपघातांची संख्या घटली आहे. मात्र 20 नोव्हेंबरला कानपूरमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला. त्यानंतर आता मोठ्या प्रमाणात घातपाताचे प्रयत्न सुरु आहेत, ते रोखण्यासाठी रेल्वे कसोशीने प्रयत्न करत असल्याचं प्रभू म्हणाले.
याशिवाय मुंबई-अहमदाबाद हा बुलेट ट्रेनचा मार्ग काँग्रेसनेच नियोजित केला होता. मोदी सरकारने केवळ त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले, असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं.
सुरक्षित रेल्वेसाठी 1 लाख कोटी
प्रवाशांची सुरक्षा हेच रेल्वेचं प्राधान्य आहे. त्यासाठीच यंदाच्या बजेटमध्ये सुरक्षेसाठी 1 लाख कोटींची तरतूद केल्याचं प्रभू म्हणाले.
सुरक्षेसाठी रेल्वेच्या आधी ट्रॅकवरुन एखादं यंत्र जाईल, अशी यंत्रणा तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सुरेश प्रभूंनी सांगितलं.
मी स्वत: ट्रेनने प्रवास केला आहे. कॉलेजला ट्रेनने जात होतो. त्यामुळे मुंबईतील लोकल ट्रेनच्या परिस्थितीबाबत मला जाण आहे, असं त्यांनी सांगितलं.
मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा
मी देशाचा रेल्वेमंत्री असलो, तरी महाराष्ट्र हे माझं प्रेम आहे. महाराष्ट्राचा शक्य तितका फायदा होईल, यासाठी माझा प्रयत्न राहील. यापूर्वी महाराष्ट्राची 1 हजार कोटीत बोळवण व्हायची, पण यंदा महाराष्ट्रासाठी 6 हजार कोटी दिले. तर मुंबईसाठी 52 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सुरेश प्रभू म्हणाले.
लोकलच्या गर्दीवर उपाय
मुंबईकरांसाठी उन्नत मार्गाचा पर्याय आहे. अनेक नव्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.लोकलचा भार कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं असून, वेळ बदलण्याबाबत विचारमंथन सुरु आहे, असं प्रभूंनी सांगितलं.
मेट्रोचं जाळं
मुंबईत मेट्रोचं जाळं उभारल्यानंतर गर्दीचा ताण कमी होईल. काही वर्षांनी रेल्वे आणि मेट्रोची स्पर्धा सुरु होईल, असा विश्वास प्रभूंनी व्यक्त केला.
झोपडपट्टी ट्रॅकसाठी अडचण
मुंबईत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मोठी झोपडपट्टी आहे. त्यांना हटवणं मोठं काम आहे. रेल्वेचे काही लोक सामील असल्यामुळेच ट्रॅकभोवती झोपडपट्टी वाढतेय. मात्र रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी मॅपिंग करण्याचं काम सुरु असल्याचं सुरेश प्रभू यांनी सांगितलं.
शरद पवारांनी भाषण ऐकलं
मी 31 व्या वर्षी सारस्वत बँकेच्या चेअरमनपदी होतो. साखर परिषदेतील भाषण ऐकून शरद पवारांनी माझी शिखर सहकारी बँकेवर नियुक्ती केली. त्यावेळी मी राजकारणात नव्हतो. तर चेंबूरमधील एका कार्यक्रमात बाळासाहेबांसमोर भाषण केलं, तेव्हा बाळासाहेेबांच्या संपर्कात आलो, अशी आठवण सुरेश प्रभू यांनी सांगितली.
मुंबई महापालिकेत भाजपला मत द्या
सुरेश प्रभू हे शिवसेनेत होते. अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात उद्योग आणि ऊर्जा मंत्रीपद त्यांना मिळालं होतं. मात्र मोदींनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिलं, त्यामुळे प्रभू यांना शिवसेनेतून भाजपमध्ये पक्षांतर करावं लागलं. आता मी भाजपचा झालो आहे. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिकेत भाजप सत्तेत आली, तर विकासाला चालना मिळेल, असं प्रभू म्हणाले.
मी शिवसेनेतूनच मोदींच्या मंत्रिमंडळात जावं, यासाठी त्यावेळी अनेक प्रयत्न झाले. मला कोणतं खातं मिळणार हे माहित नव्हतं. मला सेवा करण्याची संधी मिळाली, त्यामुळे पक्षांतर केल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी पक्षांतर न करता माझ्याकडे मंत्रिपद कसं येईल, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न झाले, असंही सुरेश प्रभू यांनी सांगितलं.
याशिवाय अटल बिहारी वाजपेयींच्या काळात तीन वेळा शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये मी, मुरली मनोहर जोशी आणि राम जेठमलानी या तिघांचाच समावेश होता, असं प्रभूंनी सांगितलं.
माझा कट्टावरील मुददे
- मी जबाबदारी सोडण्याचा नव्हे तर मिळालेल्या जबाबादारीचा लोकांना फायदा करुन देण्याचा प्रयत्न, कोणाच्या खिशात (राजीनामा) काय आहे मला माहित नाही - सुरेश प्रभू
- मी, मुरली मनोहर जोशी आणि राम जेठमलानी या तिघांनीच अटलजींसोबत तीनवेळा शपथ घेतली - सुरेश प्रभू
- स्वातंत्र्यापासून 12 हजार किमीपर्यंत डबलिंग झालं, पण आज 15 हजारपर्यंत झालंय - सुरेश प्रभू
- काम करताना अनेक अडचणी येतात, पण मिळालेल्या संधीचं सोनं करा - सुरेश प्रभू
- गेल्या 3- 4 वर्षात मोदी एक दिवसही काम न करता राहिलेत असं झालेलं नाही, ते सतत कामात असतात -
- पंतप्रधान काम करतात, त्यामुळे मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना सर्वांना काम करावं लागतं
- सरकारचं संपूर्ण काम पारदर्शी असावं हे केंद्राचं ध्येय, त्यामुळे ई टेंडरिंगला प्राधान्य
- 35 हजार कोटी जे रेल्वे बजेटमध्ये खर्च व्हायचे, ते आता वाचतायेत - सुरेश प्रभू
- मला आई आवडते, याचा अर्थ बायको आवडत नाही असं नाही, त्यामुळे बुलेट ट्रेनसारख्या नव्या योजनांकडे दुर्लक्ष नको
- जपानच्या मदतीने बुलेट ट्रेनचं काम, जुन्या आणि नव्या रेल्वेची सांगड घालून, प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रयत्न
- बुलेट ट्रेनमुळे मुंबई लोकलकडे दुर्लक्ष नाही, मुंबईसाठी स्वतंत्र निधी - सुरेश प्रभू
- बुलेट ट्रेनचा मुंबई-अहमदाबाद मार्गाचा निर्णय काँग्रेसचाच - सुरेश प्रभू
- पहिल्या बजेटची अंमलबजावणी काय झाली, याचा अक्शन टेकन रिपोर्ट घेतला
- महाराष्ट्राला यावर्षी 6 हजार कोटी रुपये दिले - सुरेश प्रभू फक्त योजनांची घोषणा म्हणजे अर्थसंकल्प नव्हे - सुरेश प्रभू
- कोकण रेल्वेचं डबलिंगचं काम सुरु, 13 नव्या स्टेशनमुळे क्रॉसिंग सुविधा उपलब्ध
- पुढच्या पाच वर्षात मेट्रोचं जाळं आणि रेल्वेच्या नव्या प्रकल्पामुळे गर्दीवर नियंत्रण येईल-
- रेल्वेच्या प्रकल्पांमध्ये राज्य सरकारलाही सहभागी करुन घेतोय, जॉईंट व्हेंचरमुळे कामं जलद होतील
- रेल्वेमंत्री असलो तरी महाराष्ट्र हे पहिलं प्रेम आहेच
- उपनगरातील रेल्वेचा प्रश्न हा माझ्या जिव्हाळ्याचा
- कोकणी पदार्थ रेल्वेत देण्याची सुविधा केली, त्यामुळे कोकणातील महिला बचत गटांना रोजगार मिळाला
- पूर्वी तक्रार नोंदली गेली नाही, ही तक्रार असायची, आता ऑनलाईन माध्यमातून आम्ही तक्रारी सोडवतो
- दररोज लाखो प्रवाशांशी संपर्क साधून तक्रारी सोडवतो, मोबाईल, इंटरनेटद्वारे अनेक तक्रारींचं निवारण
- क्लीन माय कोच, SMS द्वारे 15 मिनिटात कोच क्लीन सुविधा
- वायफायसाठी एकदाच खर्च, मात्र रेल्वे शौचालयांसाठी मेंटेनन्स आवश्यक असतो
- माझं सर्वपक्षीयांशी उत्तम संबंध, पण आता माझा पक्ष भाजप
- पक्षांतर न करता मला खातं मिळावं यासाठी त्यावेळी पक्षाकडून प्रयत्न झाले
- रेल्वेच्या खेळाडूंनी समस्या खिलाडूवृत्तीने स्वीकाराव्यात - सुरेश प्रभू
- अंध प्रांजल पाटीलला नोकरी देण्यासाठी माझा स्वत:चा प्रयत्न -
- मी देशाचा मंत्री असलो, तरी माझं महाराष्ट्रावरच, मराठी माझी आई, इथल्या लोकांसाठी माझे जास्त प्रयत्न
- UPSC चे महाराष्ट्रीय विद्यार्थी मला भेटायला आल्याचं माहीत नव्हतं, लाठीमार झाल्याचं माहीत नव्हतं
- मराठी मुलांवर लाठीमार झाल्यानंतर मी चौकशीचे आदेश दिले
- मराठी मुलांवरुन राजकारण करु नका
- AC लोकलची योजना झाली त्यावेळी मी मंत्री नव्हतो,
- जेव्हा तुम्ही चुकीचं वागाल, तेव्हा स्वत:चं अंतर्मनच टोचत असतं, मी काही चुकीचं केलं नाही
- मोदी-फडणवीस कामं करतायेत, त्यांचं नेतृत्त्वात मान्य करायला हवं
- राज्य-केंद्र सरकारबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली नाही
- IRCTC ची वेबसाईट आणखी युझर फ्रेण्ड्ली करण्याचा प्रयत्न
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement