एक्स्प्लोर
Advertisement
ना पार्थ, ना शरद पवार, मीच लोकसभा लढवणार: सुप्रिया सुळे
ना पार्थ, ना शरद पवार, आमच्या घरातून केवळ मीच लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुंबई: आमच्यासाठी प्रत्येकजण आणि प्रत्येक मतदारसंघ महत्वाचा आहे. लोकांना लढायची इच्छा आहे हे पक्षासाठी चांगलं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या. शिवाय ना पार्थ, ना शरद पवार, आमच्या घरातून केवळ मीच लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
उदयनराजे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील का?
कोणी कोणाला विरोध केला ही माझ्याकडे माहिती नाही. उदयनराजेंबद्दलची चर्चा माझ्या कानावर आली नाही. आम्ही तिकिटं कोणावर लादणार नाही, तर कार्यकर्त्यांच्या भावना बघून नंतर निर्णय घेतला जाईल. हा पहिला टप्पा झाला. अजून बैठका बाकी आहेत. अनेक मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते उत्सुक आहेत.
पार्थबद्दल काय वाटतं? तो राजकारणात येणार आहे का?
पार्थबद्दलची चर्चा फक्त माध्यमांमध्ये पाहिली आहे. घरात किंवा पक्षात पार्थबद्दलची चर्चा झाली नाही. सगळ्याच जागा कुटुंबातल्या लोकांनी घेतल्या, तर कार्यकर्त्यांचं काय होणार हे शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे लोकसभेला आमच्या घरातून एकच इच्छुक आहे, ती म्हणजे मी.
पार्थनं भविष्यात राजकारणात यायची इच्छा व्यक्त केली तर?
आमची मावळची बैठक झाली आहे, त्यात पार्थनं कोणतीच इच्छा व्यक्त केली नाही. भविष्यात काय होईल हे आता सांगता येत नाही.
ठाण्यातील परप्रांतीयाने चिमुकलीशी केलेल्या अश्लिल चाळ्याच्या घटनेबाबत काय म्हणाल?
ठाण्याच्या घटनेचा निषेध करते, या प्रवृत्तीचा निषेध करते. वर्दीची भिती लोकांमध्ये राहिली पाहिजे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये समाज म्हणून बदल घडवले पाहिजे. चिमुकलीशी अश्लिल चाळे, मनसेने पत्रकार परिषद घेऊन आरोपीला चोपलं
संजय निरुपमांच्या वक्तव्यांकडे कसं बघताय?
संजय निरुपमवर अशोक चव्हाण बोलले आहेत. पण आज गुजरातमध्ये जे घडतंय ते दुर्दैवी आहे. गुजरात मॉडेल आपण समोर ठेवतो, पण गुजरातमध्ये पोलिस यंत्रणा फेल ठरली आहे.
संबंधित बातम्या
निवडणूक लढवणार की नाही? शरद पवारांचं उत्तर
...तर उदयनराजेंनी रिपाइंकडून लढावं : रामदास आठवले
चिमुकलीशी अश्लिल चाळे, मनसेने पत्रकार परिषद घेऊन आरोपीला चोपलं
महाराष्ट्र आणि मुंबई उत्तर भारतीय चालवतात : संजय निरुपम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement