एक्स्प्लोर
नोटाबंदी: एका रात्रीत ठेकेदाराच्या बँक खात्यात तब्बल 62 लाख जमा!
मुंबई: बँक खात्यात अचानक 62 लाख रुपये जमा झाल्यामुळे नालासोपारातील अजय कुमार पटेल यांना नाहक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. अजय कुमार पटेल यांचा खात्यात 14 नोव्हेंबरला अचानक 62 लाख रुपये जमा झाले. त्यामुळं बँकेनं त्यांचं खातं सील केलं आहे.
विशेष म्हणजे अजय कुमार आपल्या गावी गेले असताना हा प्रकार घडला. अजय कुमार पटेल हे मुंबईमध्ये एक कंट्रक्शन ठेकेदार म्हणून काम करतात. गावाहून मुंबईत परत येण्यासाठी अजय यांना रेल्वेचं तिकीट बूक करायचं होतं. त्यावेळी बँकेतून पैसे काढण्यासाठी गेलेल्या अजय यांना आपलं खातं सील झाल्याचं समजलं. त्यानंतर त्यांनी यासंबंधी बँकेशी संपर्क साधला असून याप्रकरणी बँकेकडून अधिक चौकशी सुरु आहे.
दरम्यान, देशात नोटाबंदी केल्यानंतर असे प्रकार घडण्याची शक्यता अर्थमंत्रलयाकडून आधीच वर्तवली होती. एकीकडे सरकारकडून प्रामाणिकतेसाठी म्हणजेच पारदर्शी व्यवस्थेसाठी प्रयत्न केले जात असताना, फसवेगिरी करणाऱ्याची ही संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement