एक्स्प्लोर
Advertisement
बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयातील 86 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूचा धोका, प्रशासनाचं दुर्लक्ष
रुग्णालय प्रशासनाला कल्पना देऊन देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. प्रशासनाने सध्या एका वॉर्डमध्ये तब्बल 86 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर दाटीवाटीने राहण्याची वेळ आली आहे
मुंबई : मुंबईतील बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचा गलथान कारभार सध्या समोर आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णांच्या वॉर्डमध्ये राहण्याची वेळ आली आहे. धक्कादायक म्हणजे या विद्यार्थ्यांच्या शेजारील वॉर्डमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण होण्याची शक्यता आहे. सध्या याठिकाणी राहणाऱ्या 86 विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी आजारी आहेत.
याबाबत रुग्णालय प्रशासनाला कल्पना देऊन देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. प्रशासनाने सध्या एका वॉर्डमध्ये तब्बल 86 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर दाटीवाटीने राहण्याची वेळ आली आहे. गंभीर बाब म्हणजे याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन बाथरूम देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार महाविद्यालयाच्या वेळेचा विचार करता सध्या एका विद्यार्थ्यांला आंघोळीसाठी किमान चार दिवसांची वाट पहावी लागते.
त्यामुळे त्यांना विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांची 14 तारखेपासून परीक्षा सुरु होणार आहे. सध्याची राहण्याची व्यवस्था पाहता अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित करायचं असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. सध्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन प्रशासनाविरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी देशभरातील टॉप रँकिंगचे विद्यार्थी आहेत. गेले 4 दिवस महाविद्यालयातील 200 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन प्रशासनाविरोधात संप पुकारला आहे. सध्या एकही विद्यार्थी लेक्चरला बसत नाहीत. जर आमची लवकरात लवकर राहण्याची व्यवस्था केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांनी केला आहे.
प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना बाहेर राहण्याचा सल्ला
या महाविद्यालयात देशांतील उत्तम गुण मिळवून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील बहुतेक विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार जर विद्यार्थ्याने बाहेर राहण्याचा विचार केल्यास त्या विद्यार्थ्याला महिन्यांला कमीत कमी 25हजार रुपये खर्च आहे. यातील बहुतेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचं वार्षिक उत्पन्नचं केवळ एक लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे आता त्यांनी कुठं राहायचं असा प्रश्न उपस्थित राहिला आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement