एक्स्प्लोर
माता नव्हे वैरीण... सावत्र आईनं मुलीला विकलं
नालासोपारा: राजस्थानात विक्री करण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीची नालासोपारा पोलिसांनी सुटका केली आहे. 14 वर्षांच्या या मुलीला तिच्या सावत्र आईनं एका 40 वर्षीय व्यापाऱ्याला साडेसहा लाखांत विकलं होतं. याप्रकरणी स्वतः मुलीनं पोलिसांत तक्रार दिली असून व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर आईच्या शोधासाठी राजस्थानात पथक पाठवण्यात आलं आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर या मुलीची जबाबदारी सावत्र आईवर पडली. त्यातून बाहेर पडण्यासाठी तिनं 14 वर्षांच्या मुलीची 16 वर्षीय म्हणून साडे सहा लाखांत विक्री केली होती.
गेले चार महिने व्यापाऱ्याकडून शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्यानंतर या मुलीनं पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला आणि आपली सुटका करुन घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement