एक्स्प्लोर
विविध मागण्यांसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
विविध मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी, राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. 21 आणि 22 सप्टेंबरला चतुर्थश्रेणी कर्मचारी संपावर जाणार आहेत.
![विविध मागण्यांसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा State Governments Fourth Class Employees To Go On Strike विविध मागण्यांसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10082827/Govt-employee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
मुंबई : वेगवेगळ्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी, महाराष्ट्र राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. 21 आणि 22 सप्टेंबरला चतुर्थश्रेणी कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास कर्मचाऱ्यांनी 27 सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला.
यासंदर्भात चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. यात अनुकंपा तत्वावरील भरती विनाअट करावी, निवृत्तीनंतर पाल्यास सरकारी नोकरी मिळावी, सर्व खात्यातली चतुर्थ श्रेणी वर्गाची पदं तात्काळ भरावी यासह इतर काही मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचा पवित्रा घेतला आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी शासन करत नसल्यामुळे संप करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
तसेच दोन दिवसांच्या संपानंतरही शासनाने त्वरित कार्यवाही केली नाही, तर मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी 27 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जातील, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)