एक्स्प्लोर
Advertisement
विक्रीसाठी आणलेले 523 स्टार कासव कुर्ला टर्मिनसमधून जप्त
आंध्र प्रदेशमधील एक महिला गुरुवारी (6 सप्टेंबर) हे कासव घेऊन मुंबईत विक्रीसाठी घेऊन आली होती.
ठाणे : कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये एका महिलेकडून अतिशय दुर्मिळ आणि वन्यजीव कायद्यांतर्गत बंदी असलेले स्टार प्रजातीच्या कासव ठाणे विभागाने जप्त केले आहेत. एक, दोन नव्हे तर तब्बल 523 स्टार प्रजातीच्या कासवांची तस्करी करण्यात येत होती. वन्यजीव कायद्यांतर्गत हे कासव पाळणं गुन्हा आहे.
आंध्र प्रदेशमधील एक महिला गुरुवारी (6 सप्टेंबर) हे कासव घेऊन मुंबईत विक्रीसाठी घेऊन आली होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा विविध भागात या कासवांची डिलिव्हरी केली जाणार होती. ही महिला गुरुवारी जेव्हा एलटीटी स्टेशनवर उतरली, तेव्हा सापळा रचून वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो आणि ठाणे वन्यजीव विभागाच्या डीव्हीजनने कासव तस्करीप्रकरणी तिला अटक केली. या महिलेला काल (7 सप्टेंबर) कोर्टाने 11 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
फेंगशुईसाठी तसंच अंधश्रद्धा म्हणून घरात किंवा कामाच्या ठिकाणी स्टार जातीचे कासव पाळले जातात. पाठीवर सोनेरी रंगाची चांदणी असलेल्या कासवांना काही जण शुभ मानतात. तर जादूटोण्यासाठी काही जण याचा वापर करतात. त्यामुळे या कासवांना बरीच मागणी असते. आंतरराष्ट्रीय बाजारात या कासवांची किंमत अतिशय जास्त आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement