एक्स्प्लोर

घर सोडण्यास नकार दिल्याने वृद्ध आई-वडिलांना मारहाण, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

संपत्तीच्या हव्यासापोटी आई वडिलांना वारंवार घर सोडण्याचा तगादा लावला. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर मुलाने आपल्या पत्नीसह मिळून आई वडिलांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे.

डोंबिवली : सध्या आपल्या आसपास अनेक माणूसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडत असतात. माणूसकीच्याच नाही तर रक्ताच्या नात्यांनाही काळीमा फासणाऱ्याी घटना समोर येत असतात. अशीच एक घटना डोंबिवली पश्चिमेतून समोर आली आहे. आधी संपत्तीच्या हव्यासापोटी आई वडिलांना वारंवार घर सोडण्याचा तगादा लावला. मात्र आजारी आई वडिलांनी घर सोडण्यास नकार दिल्याने मुलाने पत्नीसह मिळून वृद्ध आई वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास डोंबिवली विष्णुनगर पोलीस करत आहेत.

आई-वडिल जखमी

डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरात चंद्रकांत ठाकूर हे आपली पत्नी कमल ,मुलगा चेतन आणि सून शिल्पा सोबत राहतात. दरम्यान कमल या किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान चंद्रकांत ठाकूर यांनी त्यांच्या मालकीची घरे भाडयाने दिली असून त्यांना दरमहा 60 हजार रुपयांपर्यंत भाडं येतं. पण काही महिन्यांपासून त्यांचा मुलगा चेतन आणि सून शिल्पा हे दोघेही त्यांना त्रास देऊ लागले. पण आता चेतन आणि त्याच्या पत्नीने कहरच केला. त्यांनी चंद्रकांत आणि कमल यांना शनिवारी रात्री मारहाण केली. या मारहाणीत चंद्रकांत यांच्या हाताला दुखापत झाली असून कमल यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. सध्या दोघांवरही डोंबिवलीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांची कारवाई सुरु

या सर्व प्रकाराबाबत चंद्रकांत यांनी मुलगा चेतन आणि सून शिल्पा हे दोघेही आमच्या मालमत्तेसाठी मागे लागले असून आम्हाला घरात राहू नका, असे सांगत आहेत. त्याच वादातून आम्हाला त्रास देत असून मारहाणही केली आहे. दरम्यान याबाबत जवाब नोंदवन्याचं काम सुरू असून मारहाण करणाऱ्यां विरोधात ठोस कारवाई केली जाईल अस विष्णू नगर पोलिसांनी सांगितलं, पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
Ganesh Festival 2026 MSRTC : गौरी-गणपतीसाठी एसटी महामंडळाचा मेगाप्लॅन, कोकणात एसटीच्या 5,220 जादा बसेस धावणार, प्रताप सरनाईक यांची माहिती
गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5220 जादा बसेस धावणार, प्रताप सरनाईक यांची माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget