ऐकावं ते नवलचं! घाटकोपरमध्ये चक्क शौचालयच गेलं चोरीला
घाटकोपर पश्चिमेच्या रेल्वे स्थानक परिसरात चक्क सार्वजनिक शौचालय चोरीला गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने याविरुद्ध आंदोलन देखील केलं आहे.

घाटकोपर : आतापर्यंत आपण सोन्या-चांदीचे दागिने, पैसे, घरातल्या महागड्या वस्तू तसंच वाहनं चोरी झाल्याचे ऐकत होतो. पण आता मुंबईतील उपनगर घाटकोपर मध्ये तर चक्क दोन शौचालयं एका रात्रीत चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील देण्यात आली असून स्थानिक नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याविरुद्ध आंदोलन देखील केले आहे.
घाटकोपर पश्चिमेला रेल्वे स्टेशन परिसरात असलेली दोन शौचालयं एका रात्रीत जेसीबी मशीनद्वारे पालिकेला किंवा स्थानिकांना न कळवता अज्ञातांकडून हटवण्यात आली. ज्यानंतर सकाळी जेव्हा या ठिकाणी स्थानिक नागरिक शौचालयाचा वापर करण्यासाठी गेले, तेव्हा त्याठिकाणी टॉयलेट नव्हते. त्यामुळे स्थानिकांनी लगेचच या प्रकरणाची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन
या सर्व प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी याविरुद्ध आंदोलन देखील केलं. त्यांनी चोरीला गेलेले शौचालय लवकरात लवकर प्रशासनाने शोधून द्यावे आणि ज्यांनी चोरी केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. या प्रकरणी पालिका आणि पोलीस यांना देखील काहीच माहीत नसल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे असे कोणी का केले आहे आणि यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा -
- नाना तुमच्या स्वागताला आम्ही उत्सुक, पुण्यात फ्लेक्सबाजी करत भाजपचे पटोलेंना आव्हान
- School Reopen : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्स सदस्य सकारात्मक, आजच्या बैठकीत होणार चर्चा
- Antilia Case : परमबीर-वाझे गुप्त भेटी प्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
