Antilia Case : परमबीर-वाझे गुप्त भेटी प्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
सचिन वाझे आणि मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चांदिवाल कमिशनच्या कार्यालयात गुप्त भेट झाल्याचा आरोप करण्यात आला होता, ज्याची चौकशी सुरु होती.
नवी मुंबई : अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणातील (Antilia Case) प्रमुख आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) आणि मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांची चांदिवाल कमिशनच्या कार्यालयात गुप्त भेट झाल्याच्या आरोपाप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या कैदी पार्टीतील चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे काही दिवसांपूर्वी चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची तब्बल एका तासासाठी भेट झाली होती, असं समोर आलं. ज्यानंतर या भेटीची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश दिल्याची माहितीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती. आता याप्रकरणी आरोपी सचिन वाझे याला तळोजा तुरुंगातून मुंबई येथील चांदिवाल कमिशनच्या कार्यालयात सुनावणीसाठी घेऊन जाणाऱ्या कैदी पार्टीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्तांना दिले होते. सदर चौकशीत नवी मुंबई पोलिस दलातील एक पोलिस उपनिरीक्षक व तीन पोलिस कर्मचाऱ्यांना प्रोटोकॉलचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता या अधिकाऱ्यांनी पुढील 15 दिवसांत या नोटीसीला उत्तर देणे अपेक्षित असून हे अधिकारी काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.
हे ही वाचा -
- 100 Crore Vasooli : भेटीगाठीचं सत्र थांबेना, वाझे-परमबीर भेटीनंतर आता वाझे-देशमुख यांच्यातही भेट?
- नाना तुमच्या स्वागताला आम्ही उत्सुक, पुण्यात फ्लेक्सबाजी करत भाजपचे पटोलेंना आव्हान
- School Reopen : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्स सदस्य सकारात्मक, आजच्या बैठकीत होणार चर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha