एक्स्प्लोर
Advertisement
म्हाडाच्या सोडतीत शिवसेनेच्या तीन लोकप्रतिनिधींना कोट्यवधींची घरं
'गेल्या 20 वर्षांपासून राजकारणात आहे. पाच वर्षांपासून शिवसेनेत आहे. घर लागल्यामुळे शिवसेना माझ्यासाठी लकी ठरली', अशी भावना शिवसेना शाखाप्रमुख विनोद शिर्के यांनी व्यक्त केल्या.
मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या सोडतीमध्ये 'शिवसेने'ला लॉटरी लागली आहे. शिवसेनेचे शाखा प्रमुख विनोद शिर्के, नगरसेवक रामदास कांबळे आणि खासदार हेमंत गोडसे यांना कोट्यवधी रुपयांची घरं लागली आहेत.
नाशिकमधील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना लोअर परेलमध्ये म्हाडाचं घर लागलं. या फ्लॅटची किंमत 99 लाख रुपये असल्याची माहिती आहे. सायनमधील प्रतिक्षानगरचे शिवसेना नगरसेवक रामदास कांबळे यांना तुंगा, पवई भागात उच्च उत्पन्न गटातील 99 लाख रुपये किमतीचे म्हाडाचे घर लागले.
शिवसेनेचे शाखा प्रमुख विनोद शिर्के यांना कोट्यवधी रुपयांच्या किमतीचे दोन फ्लॅट लागले. ग्रँट रोडमध्ये 'कंबाला हिल' परिसरात असलेल्या धवलगिरी इमारतीत हे फ्लॅट आहेत. एकाची किंमत पाच कोटी 80 लाख, तर दुसऱ्याची चार कोटी 99 लाख रुपये आहे.
शिवसेना लकी - शिर्के
'गेल्या 15 वर्षांपासून म्हाडाच्या घरासाठी अर्ज करत होतो. मी एक आयटी इंजिनियर आहे, सध्या शेअर मार्केटमध्ये आहे. त्यामुळे घर घेण्याची इच्छा होती. याआधी कोट्यवधी किमतीचं घर निघालं नव्हतं, पण आता घर घेण्याचं स्वप्न साकार झालं.' अशा भावना शिर्केंनी व्यक्त केल्या.
'गेल्या 20 वर्षांपासून राजकारणात आहे. पाच वर्षांपासून शिवसेनेत आहे. घर लागल्यामुळे शिवसेना माझ्यासाठी लकी ठरली', असं सांगतानाच घरच्यांशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेणार असल्याचं विनोद शिर्के यांनी सांगितलं.
लॉटरीत यंदा नशिबाची हुलकावणी
भाजपचे माजी आमदार आणि नगरसेवक अतुल शहा हे कांदिवली महावीर नगर मधील म्हाडाच्या घराच्या प्रतीक्षा यादीत आहेत. खरं तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अतुल शहा हे लॉटरी पद्धतीने विजयी झाले होते. शहा आणि शिवसेना उमेदवाराला समसमान मतं मिळाल्यामुळे लॉटरी पद्धतीने निकाल काढल्यावर शहा निवडून आले होते.
हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती
मुंबईत हक्काचं घर घेण्याचं एक हजार 384 जणांचं स्वप्न 'म्हाडा'ने पूर्ण केलं. मुंबई विभागातल्या घरांची वांद्र्यात सोडत झाली. तब्बल एक लाख 64 हजार अर्ज यासाठी आले होते.
प्रत्येक प्रवर्गात मोठी स्पर्धा असल्यामुळे अर्जदारांमध्ये मोठी उत्सुकता होती. अनिता तांबे या म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीच्या पहिल्या विजेत्या ठरल्या. लवकरच कोकण विभागाचीही म्हाडाची लॉटरी काढली जाईल, असं यावेळी सांगण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement