एक्स्प्लोर
भाजपकडे बहुमत, त्यांना पत्ते पिसण्याचा अधिकार, सेनेचं स्वसांत्वन
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून हा मंत्रिमंडळ विस्तार एनडीएचा नसून भाजपचा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना, अकाली दल, तेलगू देसम या घटक पक्षांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, असं म्हणत शिवसेनेनं स्वसांत्वनही केलं आहे.
भाजपकडे बहुमत असल्याने त्यांनाच पत्ते पिसण्याचा पूर्ण अधिकार असल्याचंही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हणण्यात आलं आहे. शिवाय, मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे राज्या-राज्यातील राजकीय समीकरणं सांभाळण्यासाठी आहे, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.
भाजपकडे बहुमत, त्यांना पत्ते पिसण्याचा अधिकार
शिवसेनेने ‘सामना’मध्ये म्हटलं आहे की, “मंत्रिमंडळ विस्तार मोदी सरकारची गती किती वाढवतोय हे येणारा काळच ठरवेल! हा विस्तार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा म्हणजे एनडीएचा नव्हता, तर भाजपचा होता. शिवसेना, अकाली दल, तेलगु देसम या एनडीएतील घटक पक्षांना वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. भाजपकडे बहुमत आहे. त्यामुळे त्यांना पत्ते पिसण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाहीत बहुमत हे निसरड्या लादीवरील शेवाळाप्रमाणे असते. म्हणूनच विस्तारित मंत्रिमंडळास पाय घट्ट रोवून काम करावे लागेल.”
मोदीच मंत्रिमंडळाचा चेहरा
केंद्रीय मंत्रिमंडळात मोदीच चेहरा असल्याचं सांगत सामनातून इतर मंत्र्यांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधण्यात आला आहे. शिवाय, मनमोहन सिंह यांच्या अर्थमंत्रिपदाच्या कारकीर्दीची स्तुतीही केली आहे.
“केंद्रातील मंत्रिमंडळात मंत्र्यांची ‘आवक-जावक’ सुरूच असली तरी ‘मोदी’ हाच एकमेव मंत्रिमंडळाचा चेहरा आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात एकास एक तालेवार नेते होते. मग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील, बाबू जगजीवनराम असतील, यशवंतराव चव्हाण असतील, शंकरराव चव्हाणांचासुद्धा उल्लेख करावाच लागेल. मनुष्यबळ विकास मंत्रालयास ओळख मिळाली पी. व्ही. नरसिंह रावांमुळेच, पण देशाला अर्थमंत्री आहे व तो काम करतोय हे जगाला कळले ते मनमोहन सिंग यांच्यामुळे. अर्थात त्या तोडीचे नेते आता निर्माण होणार नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनाच सर्व भार पाहावा लागत असेल तर काय करायचे? अधूनमधून मंत्रिमंडळ विस्ताराची गाजरे दाखवावी लागतात तर काही वेळेस विस्ताराचे पत्ते पिसून पाने वरखाली करावी लागतात. तसे पिसणे पुन्हा एकदा झाले आहे.”, असे ‘सामना’त म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement