एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेना मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही : राऊत
लोकसभा आणि विधानसभा जागावाटपाची चर्चा एकत्र व्हावी की नाही यावरुन युतीच्या चर्चेचं घोडं अडल्याचं बोललं जातं आहे.
मुंबई : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना, राज्यात शिवसेना-भाजप युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे युतीची चर्चा पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत. "शिवसेना इथे मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही," असं संजय राऊत म्हणाले.
भाजपकडून युतीचा प्रस्ताव येत असल्याच्या चर्चांबाबत विचारलं असता राऊ म्हणाले की, "आम्ही स्वबळाची घोषणा केली आहे, शिवसेना प्रस्ताव घ्यायला बसली नाही, असं उत्तर शिवसेने भाजपच्या प्रस्तावाला दिलं आहे. "शिवसेनेशी जवळीक साधावं असं सगळ्यांनाच वाटतंय हल्ली. पण शिवसेना इथे मुंडावळ्या लावून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही. आमचं मॅरेज ब्युरो नाही, प्रपोजल येतायत. शिवसेना, शिवसेना आहे.
येत्या दोन दिवसात शिवसेना-भाजप युतीच्या अधिकृत चर्चेला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा जागावाटपाची चर्चा एकत्र व्हावी की नाही यावरुन युतीच्या चर्चेचं घोडं अडल्याचं बोललं जातं आहे. शिवसेनेकडून अद्याप कुठलीही 'कमिटमेंट' भाजपला देण्यात आलेली नाही. मात्र येत्या दोन दिवसात भाजप युतीचा अधिकृत प्रस्ताव देणार आहे, त्यानंतर चर्चेचं अडलेलं घोडं पुढे सरकण्याची चिन्हं आहेत.
संबंधित बातम्या
शिवसेना-भाजप युतीचं घोडं कुठे अडलं आहे?
ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका : उद्धव ठाकरे
युती न झाल्यास लढणार नाही, शिवसेनेचे पाच खासदार अस्वस्थ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement