एक्स्प्लोर

वर्षभरात जे साचलंय त्याचा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आज समाचार घेतील : संजय राऊत

लसीचं राजकारण करण्याइतक्या कोत्या मनोवृत्तीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मागच्या दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार असं राऊत म्हणाले होते. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता येईल असं भाकित संजय राऊतांनी केलं आहे.

मुंबई : दसऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनाबाधित झाले आहेत. फडणवीसांना वारंवार सांगत होतो काळजी घ्या. कोरोना कोणालाही सोडत नाही. लसीचं राजकारण करण्याइतक्या कोत्या मनोवृत्तीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोललो होतो की मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार. भाजपसोबत युती झाली असती तरी शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला असता. वर्षभरात जे जे साचलं होतं ते ते आज पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे एक एकाचा समाचार घेतील, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

एबीपी माझाशी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भातील तयारीचा आढावा सांगितला.  आजचं सीमोल्लंघन कसं असेल ते रात्रीच समजेल, असं संजय राऊत म्हणाले. 2019 चा दसरा मेळावा आमच्यासाठी महत्वाचा होता. मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोललो होतो की मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार. त्यामुळे आजचा दसऱ्या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थाच्या बाजूला असलेल्या वीर सावरकर सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. या दसऱ्या मेळाव्याला मोजक्याच कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री भाजपाला टार्गेट करणार का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, कोरोना नसता तर शिवतीर्थ अपुरं पडलं असतं. दसऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही. उद्धव ठाकरे काय बोलतील हे तुम्हाला संध्याकाळी समजेलच. लसीचं राजकारण करण्याइतक्या कोत्या मनोवृत्तीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत. व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलणार नाहीत, तर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, कोरोनाचं संकट नसते तर शिवतीर्थ अपुरं पडलं असतं. मुख्यमंत्र्यांचं संबोधन ऐकण्यासाठी शिवतीर्थावर तुफान आलं आसतं. तरीही वीर सावरकर सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होणार असून समाजमाध्यमांच्या थेट प्रक्षेपणाद्वारे राज्यभरातील शिवसैनिकांना तो पाहता येणार आहे, असं ते म्हणाले.  ज्या पद्धतीनं मेळावा साजरा करतो त्याच पद्धतीनं साजरा करु. सर संघचालक आमचे आदर्श आहेत. त्यांनीही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रेशीम बागेतील सभागृहात मेळावा घेतला. तसाच मेळावा शिवसेना घेत आहे, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, आम्ही नियम पाळतो म्हणून मोजक्या लोकांच्याच उपस्थितीत मेळावा घेतोय. पण बिहारमध्ये 50 हजार लोकांचे मेळावे चालले आहेत. त्याचं काय? आता तुम्हीच सांगा, जनाची, धनाची आणि मनाची लाज काढत आहेत. जनाची मनाची आहे म्हणूनच हा मेळावा शिवतिर्थावर न घेता यंदा सभागृहात घेतला आहे, असं ते म्हणाले.

ते म्हणाले की, बाळासाहेबांपासून आम्ही दसरा मेळावा पाहता आलो आहोत. तेव्हा आम्ही मागे उभे राहून साहेबांचं भाषण ऐकत असायचो. शेवटच्या टोकाला उभं राहून भाषण ऐकण्यात मजा वेगळीच आहे. नंतर हळूहळू आम्ही पुढच्या रांगेत येत गेलो.

मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता मुंबई महानगर पालिकांमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता येईल असं भाकित संजय राऊतांनी केलं आहे. अनेक लोक बोलले होते की हे सरकार 11 दिवस टिकणार नाही, महिन्याभरात जाईल, गणपतीला जाईल आता दसरा आला आहे पण आता बाँम्ब त्यांच्याच खाली फुटतील. आमच्याकडे सर्व तयारी झाली आहे आता आवाज येतील, असं राऊत म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MVA MNS Mumbai Morcha: तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Mumbai Car Fire: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Satyacha Morcha: सत्याच्या मोर्चासाठी नाशिकचे मनसैनिक रवाना
Raj Thackeray Election Commission : निवडणूक आयोगावर राष्ट्रद्रोहाचा आरोप, सामनातून हल्लाबोल
Voter List Scam: 'मतचोरी'च्या आरोपांवरून काँग्रेस आक्रमक, पुरावे सादर करत BJP ला मोर्चात सामील होण्याचे आव्हान
Bala Nandgaonkar On Morcha :.कारवाई होईल त्याला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत', बाळा नांदगावकरांचा पोलिसांना इशारा
Voter List Scam: मतदार यादीत गंभीर चूक, मुल-बापाचं नाव वेगवेगळ्या धर्माचे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MVA MNS Mumbai Morcha: तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Mumbai Car Fire: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Maharashtra Live Updates: राज ठाकरे लोकलने प्रवास; मोर्चासाठी चर्चगेटला रवाना
Maharashtra Live Updates: राज ठाकरे लोकलने प्रवास; मोर्चासाठी चर्चगेटला रवाना
Dharmendra Hospitalised: ‘बॉलिवूडचे ही-मॅन’ धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
‘बॉलिवूडचे ही-मॅन’ धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
MNS MVA Mumbai Morcha: मुंबईत जय्यत तयारी झाली, पण ‘सत्याच्या मोर्चाला’ अद्यापही परवानगी मिळेना; विनापरवाना मोर्चा काढल्यास कारवाईचा इशारा
मुंबईत जय्यत तयारी झाली, पण ‘सत्याच्या मोर्चाला’ अद्यापही परवानगी मिळेना; विनापरवाना मोर्चा काढल्यास कारवाईचा इशारा
चित्रपटाच्या पटकथेचे वास्तवात रूपांतर, मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटरने शेवट; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
चित्रपटाच्या पटकथेचे वास्तवात रूपांतर, मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटरने शेवट; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
Embed widget