एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेना आमदार तुकाराम कातेंचं चिखलात बसून मेट्रोविरोधात ठिय्या आंदोलन
मानखुर्द ते अंधेरीदरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु आहे. मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर नगरच्या रहिवाशांना मेट्रोच्या या कामाचा मोठा फटका बसत आहे.
मुंबई : मानखुर्द ते अंधेरीदरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु आहे. मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर नगरच्या रहिवाशांना मेट्रोच्या या कामाचा मोठा फटका बसत आहे.
मानखुर्द येथे मेट्रो कारशेड बांधण्यात येत आहे. कारशेडच्या बांधकामासाठी या ठिकाणी अवजड वाहनांमधून मोठ्या प्रमाणात सिमेंट, रेती, मुरुमाची वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीमुळे या ठिकाणचा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे. पावसाळा सुरु असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. रसत्यांवर सर्वत्र चिखल झाला आहे.
रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे स्थानिकांना मोठा मनःस्ताप होत आहे. स्थानिकांनी यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारसुद्धा केली. परंतु या तक्रारीचे निवारण केले जात नाही.
लोकांच्या तक्रारीकडे एमएमआरडीए प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे या विभागाचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी स्थानिकांना आणि कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन सुरु केले आहे. आमदार काते स्वतः चिखलात बसून ठिय्या आंदोलनाला बसले आहेत.
एमएमआरडीएचे अधिकारी आणि मेट्रो प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी येऊन हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करणार नाहीत, तोवर हे आंदोलन असेच सुरु राहील, असा इशारा काते यांनी दिला आहे.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement