MNS MahaMorcha | मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात, शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांचा आरोप
मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात असल्याची टीका शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली आहे. मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेला फरक पडत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेचा आज महामोर्चा आहे. या मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात असून मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. भाजपला नेहमीच इतर पक्षांच्या कुबड्या लागतात, अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली आहे.
मनसेच्या या मोर्चामुळे शिवसेनेला काहीही फटका बसणार नाही. लोकांना आता कळालं आहे की, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्याची भूमिका कुणाची होती. बाळासाहेब ठाकरे यांची ही विचारसरणी आहे, त्याची कॉपी केली जात आहे. मात्र यांना हे आताच का आठवत आहे. मनसेची स्थापना होऊन आता 14 वर्ष झाली आहेत. हे मुद्दे आधी का आठवले नाहीत, असा प्रश्नही मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला.
मनसेचा महामोर्चा, मुंबईतील नाक्यानाक्यांवर मनसेचे बॅनर आणि भगवे झेंडे























