एक्स्प्लोर
LIVE: बंडखोरी मोडण्यासाठी सेनेकडून नाराजांंना वेगवेगळ्या पदांच्या ऑफर्स
मुंबई: शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होत असल्याचं समोर आलं आहे. नाराज शिवसैनिकांची बंडाळी मोडून काढण्यासाठी बंडखोरांना वेगवेगळ्या पदांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याची माहिती मिळते आहे. मतांचं विभाजन टाळण्यासाठी शिवसेनेचे अटोकाट प्रयत्न सुरु आहेत.
7 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात वेगवेगळी आमिषं दाखवत बंडाळी मोडून काढण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून केला जाईल.
प्रभादेवीमध्ये सरवणकरांविरोधात बंडखोरी
वॉर्ड क्रमांक 194 मधून आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकराच्या विरोधात अपक्ष अर्ज भरणारे महेश सावंत यांना सध्या विभागप्रमुख पदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे. तर, अभ्युदयनगर मध्ये बंडखोरीच्या तयारीत असणारे इच्छुक जयसिंग राठोड यांनाही चांगल्या पदाचं आमिष देण्यात आलं आहे.
माजी महापौर श्रद्धा जाधवांविरोधात बंडखोरी
दरम्यान, शिवसेनेकडून वेगवेगळ्या पदांच्या ऑफर देण्यात येत असल्या तरी अजूनही शिवसेनेत बंडखोरी सुरु आहेत. माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या विरोधात शिवसेनेच्या दोन महिला कार्यकर्त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे.
वरळी कोळीवाड्यात हेमांगी वरळीकरांविरोधात बंडखोरी
दुसरीकडे, वरळी कोळीवाडा वॉर्ड क्र. 193 मधून विद्यमान नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांच्या विरोधात बंडखोरी करण्यात आली आहे.
मागील 23 वर्ष शिवसेनेचं काम करत असलेल्या शिवसैनिक नवनाथ करंदेकर यांनी काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेतून शिवसेनेत परतलेले उपविभागप्रमुख हरीश वरळीकर यांच्या पत्नी हेमांगी वरळीकरला उमेदवारी दिल्याने शिवसैनिक नाराज आहेत.
वरळी, प्रभादेवी, दादर, परळ, माहीम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सध्या बरीच बंडखोरी सुरु आहे. त्यामुळे सध्या स्थानिक विभागप्रमुख आणि वरिष्ठ नेतृत्वाकडून समजूत काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
संबंधित बातम्या:
दादरमध्ये काँटे की टक्कर, स्वप्ना देशपांडे विरुद्ध विशाखा राऊत
कुणाच्या पत्नीला तर कुणाच्या मुलाला तिकीट, शिवसेनेतही घराणेशाही
LIVE: महापौर स्नेहल आंबेकरांना वॉर्ड क्र. 198मधूनच उमेदवारी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement