एक्स्प्लोर
शिवसेनेची मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, मतदानाआधी नवा वाद

मुंबई: ‘मुंबईसह 10 महापालिकांचा प्रचार संपल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना मुलाखती देण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग आहे.’ असा आरोप शिवसेनेनं केला. दादरच्या शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेवर दबाव टाकत असल्याचा आरोपही शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला आहे. ‘जर प्रचार करायचा असेल तर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री जे करत आहेत ते पारदर्शकतेच्या मापदंडात बसत नाही. आम्ही प्रचारानंतर मुलाखत देणं बंद केलं आहे. जर निवडणूक आयोगानं मुख्यमंत्र्यांना विशेष परवानगी दिली असेल तर तशी परवानगी सगळ्यांना मिळायला हवी.’ असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. VIDEO: संबंधित बातम्या:
आणखी वाचा























