एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यमंत्री, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द पाळा : उद्धव
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर भेट घेतली, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपण मराठा समाजासोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांवरील गुन्हे मागे घेतले जातील असं सांगितलं गेलं. आता मुख्यमंत्र्यांनी तो शब्द पाळावा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर भेट घेतली, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपण मराठा समाजासोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
'आरक्षण आणि इतर काही मागण्यांसाठी मराठा समाज चवताळून रस्त्यावर उतरला आहे. लाखा-लाखांचे मोर्चे काढले गेले. आंदोलन शांततेत सुरु होतं, पण कोणी फारसं लक्ष दिलं नाही, व्यथा गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्यामुळे ठोक मोर्चा निघाले.' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठा समाजाच्या आडून आंदोलनात काही समाजकंटकांनी हिंसा घडवली मात्र, त्याचं खापर मराठा समाजाच्या डोक्यावर फुटलं, त्यामुळे कारवाई होणार असेल तर न्यायाने व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
आपलं घर म्हणजे महाराष्ट्र पेटवणारा कोणीही शिवरायांचा मावळा नसेल. काही लोकांना हिंसा केली, मात्र निरपराध तरुण, तरुणी, माता, भगिनी यांची धरपकड सुरु आहे. पुरावे असतील तरच अटक करावी. गुन्हे मागे घेतले जातील असं सांगितलं होतं, पण तसे आदेश कुठल्याही पोलिस स्टेशनला दिले नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement