एक्स्प्लोर
शिवसेनेकडून आरजे मलिश्कावर टीका करणारं गाणं
‘मुंबई, तुला बीएमसीवर भरवसा नाय काय?’ हे आरजे मलिश्काचं गाणं शिवसेनेला चांगलंच झोंबलं आहे. सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत असलेल्या ‘सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का’च्या चालीवर आरजे मलिश्कानं मुंबई पालिकेवर गाणं केलं होतं.
मुंबई: ‘मुंबई, तुला बीएमसीवर भरवसा नाय काय?’ हे आरजे मलिश्काचं गाणं शिवसेनेला चांगलंच झोंबलं आहे. सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत असलेल्या ‘सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का’च्या चालीवर आरजे मलिश्कानं मुंबई पालिकेवर गाणं केलं होतं.
त्यात मुंबईतल्या खड्ड्यांचे, वाहतूक कोंडीचे, रखडलेल्या रेल्वेचे दाखले देण्यात आले होते. मलिष्काचं हे गाणं शिवसेनेला मात्र चांगलंच झोंबलं असून सेनेकडून तिला उत्तर देणारं नवं गाणं तयार करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी हे गाणं सादर केलं.
दरम्यान, यावेळी किशोरी पेडणेकर यांनी आरजे मलिश्कावर टीकाही केली. जर तुला मुंबईवर भरवसा नसेल तर आमचे शिवसैनिक तुझं रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत. असा उपरोधिक सल्लाही यावेळी पेडणेकर यांनी दिला.
VIDEO
काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय या गाण्यानं सोशल मीडियावर धमाल उडवून दिली आहे. तरुणांचे अनेक ग्रुप हे गाणं मिश्किल पद्धतीनं शूट करुन, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करत आहेत. त्याच धरतीवर रेडिओ जॉकी मलिश्कानं मुंबईतल्या समस्या आणि मुंबईचा पाऊस या गाण्यात गुंफला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे.
रेडिओ जॉकी मलिश्का ही रेड एफएम या खासगी रेडीओ वाहिनीची सूत्रसंचालिका आहे. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लगे रहो मुन्ना भाई’ या सिनेमासाठी विद्या बालनला रेडिओ जॉकीचं प्रशिक्षण दिल्याने ती सर्वाधिक चर्चेत आली. शिवाय ‘झलक दिखला जा’ या टीव्ही रिअलिटी शोच्या सातव्या पर्वतही ती सहभागी झाली होती.
संबंधित बातम्या:
मुंबई, तुला बीएमसीवर भरवसा नाय काय?, आर.जे. मलिश्काचं भन्नाट गाणं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement