एक्स्प्लोर

'पेट्रोल-डिझेल की मार, क्या यहीं अच्छे दिन है यार?' युवासेनेचा केंद्र सरकारला पोस्टर्समधून सवाल

देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलनं केली जात आहेत. मुंबईत देखील मध्यरात्री जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वाढत्या महागाईविरोधात युवासेनेकडून भाजप आमदार आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिम पोस्टरबाजी होत असल्याचं बघायला मिळत आहे.

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. काही दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किमती शंभरी पार करतील असं दिसतंय. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलनं केली जात आहेत. मुंबईत देखील मध्यरात्री जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वाढत्या महागाईविरोधात युवासेनेकडून भाजप आमदार आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिम पोस्टरबाजी होत असल्याचं बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपांवर युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिम, खार आणि सांताक्रूझमधल्या सर्व पेट्रोल पंम्पांवर हे पोस्टर मध्यरात्रीच्या सुमारास लावण्याचं काम सुरु होतं.

या पोस्टरमध्ये ‘यही है अच्छे दिन?’ असा प्रश्न उपस्थित करत मागील मोदी सरकार पहिल्या टर्मची आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या दरवाढीची तुलना करण्यात आली आहे. यात 2015 साल आणि 2021 मधल्या गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींच्या दरवाढीची तुलना केली गेली आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात 2015 साल आणि 2021 सालच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांमध्ये फरक असल्याचं म्हणत युवासेना कार्यकर्तांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. वाढत्या महागाईविरोधात निषेध नोंदवण्यासाठी ही पोस्टरबाजी केली जात असल्याचं वांद्र्यातील युवासेना कार्यकर्ते अक्षय पनवेलकर यांनी स्पष्ट केलं आहे. आताच्या महागाईच्या अच्छे दिनपेक्षा आधीचे वाईट दिवसही चालतील म्हणत युवासेना कार्यकर्ते श्याम जैस्वाल यांनी केंद्राला टोला लगावला आहे.

मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यात मागील 10 महिन्यात पेट्रोलच्या दरात 20 रुपये तर डिझेल 21 रुपयांनी महागलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील दरवाढीचा फटका सामान्यांना बसत असल्यानं केंद्र सरकारविरोधात संतापाचं वातावरण बघायला मिळत आहे.

राजकीय पक्षही केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे याआधी मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं.. त्यात आता युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पेट्रोल पंपांवरच दरवाढीचे फलक झळकवले आहेत. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. त्याचसोबत सामान्यांना बसणारी झळ कमी करत केंद्र सरकारनं यावर लवकरात लवकर पाऊलं उचलत सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी युवासेना कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Kolhapur ZP Election Result: अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज

व्हिडीओ

Aditi Tatkare : निवडणुकीतील यश पाहण्यासाठी दादा हवे होते, निवडणुकीच्या यशानंतर अदिती तटकरे भावूक
Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Kolhapur ZP Election Result: अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
Satara ZP Election Result 2026 : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातून धक्कादायक निकाल, नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या मृणाल पाटील विजयी
Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
Embed widget