एक्स्प्लोर
शीना बोरा हत्याकांड : वैद्यकीय अहवालासह जेजेतील डॉक्टरांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
प्रकृती अस्वास्थ्याचे कारण लक्षात घेत पीटर मुखर्जीला त्याच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात 15 दिवसांसाठी दाखल करण्यास हायकोर्टाने परवानगी दिली होती.
![शीना बोरा हत्याकांड : वैद्यकीय अहवालासह जेजेतील डॉक्टरांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश sheena bora murder case - Update on peter mukerjea bail from HC शीना बोरा हत्याकांड : वैद्यकीय अहवालासह जेजेतील डॉक्टरांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/26164718/Bombay-High-Court-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीने वैद्यकीय कारणांसाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारच्या सुनावणीत पीटरच्या वकिलांनी कोर्टाला माहिती दिली, की शस्त्रक्रियेनंतरची रिकव्हरी ट्रिटमेंट येत्या 17 जुलैला पूर्ण होणार आहे. त्यानंतर पीटरला पुन्हा जेजे रुग्णालयातील जेल वॉर्डमध्ये हलवता येऊ शकते. यावर हायकोर्टाने पीटरच्या जामीन अर्जावरील सुनावणी 16 जुलैपर्यंत तहकूब करत पुढील सुनावणीला जेजेतील डॉक्टरांना पीटरच्या वैद्यकीय अहवालासह हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रकृती अस्वास्थ्याचे कारण लक्षात घेत पीटरला त्याच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात 15 दिवसांसाठी दाखल करण्यास हायकोर्टाने परवानगी दिली होती. तसेच 12 जुलैपर्यंत पीटरच्या प्रकृतीचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश जेल प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर पीटरच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या पीटर मुखर्जीचा हा सहावा जामीन अर्ज आहे. विशेष सीबीआय कोर्टाने वैद्यकिय कारणांसाठी केलेला जामीन अर्ज फेटाळून लावल्याने पीटरनं याच कारणासाठी आता हायकोर्टात अर्ज केला आहे. त्याचबरोबर तपासयंत्रणेकडे आपल्याविरोधात सबळ पुरावे नाहीत, असा पीटरचा दावा अजूनही कायम आहे.
पीटर मुखर्जीला 16 मार्चला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर कोर्टाच्या संमतीने त्याला शस्त्रक्रियेसाठी खासगी रूग्णालयात हलवण्यात आले होते. तेव्हापासून पीटर मुखर्जीची प्रकृती काहीशी नाजूक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)