एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भायखळा जेलमध्ये हत्येपूर्वी महिला कैद्यावर लैंगिक अत्याचार
मुंबई: भायखळा जेलमध्ये महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धीर देत महिला कैद्यांना बोलतं केलं. तेव्हा इतर महिला कैद्यांनी घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. त्यानंतर एका महिला कैद्याच्या तक्रारीवरुन नागपाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
तक्रारीत कैदी महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील साक्षीदारांना तपास पूर्ण होईपर्यंत अन्य कारागृहात हलवण्यात यावे अशी मागणी शेट्ये कुटुंबीयांनी केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
शनिवार (24 जून 2017) भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये हा महिला कैद्यांच्या मृत्यूनंतर इतर महिला कैद्यांनी जेलमधील इमारतीच्या गच्चीवर जाऊन आंदोलन केलं होतं. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप इतर महिला कैद्यांनी केला होता.
मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं जेल प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान, आंदोलनाचा एका व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये महिला कैदी इमारतीच्या गच्चीवर जाऊन आंदोलन करत असल्याचं दिसत होतं. त्यानंतरच हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलं.
महिला कैद्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं जेल प्रशासनाच्या वतीनं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या:
भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
करमणूक
राजकारण
Advertisement