एक्स्प्लोर

आयपीएस हिमांशू रॉय यांची आत्महत्या

हिमांशू रॉय यांची आत्महत्या: राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम बजावलेल्या हिमांशू रॉय यांनी स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं.

आयपीएस हिमांशू रॉय यांची आत्महत्या: राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना) हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे. राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम बजावलेल्या हिमांशू रॉय यांनी गोळी झाडून आयुष्य संपवलं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी आयुष्याची अखेर केली. रॉय यांच्या आत्महत्येने पोलिस क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमांशू रॉय हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्याच आजाराला कंटाळून हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. डॅशिंग आयपीएस आणि सरळमार्गी अधिकारी म्हणून हिमांशू रॉय ओळखले जात होते. तोंडात गोळी मारुन आत्महत्या हिमांशू रॉय यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून तोंडात गोळी मारुन आत्महत्या केली. तोंडातून गोळी आरपार झाल्यामुळे, त्यांच्या चेहऱ्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. कोण होते हिमांशू रॉय? हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. चार वर्ष मुंबई क्राईम ब्रान्चमध्ये काम केलं होतं. तर एटीएएस प्रमुख म्हणून ते अधिक चर्चेत आले. हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणं हाताळली. यात जे डे हत्याप्रकरण, आयपीएल सट्टेबाजी प्रकरणांचा समावेश होता. हिमांशू रॉय घोड्यावरुन पडले तेव्हाच घात झाला!    मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराने ग्रासलं. त्यामुळे ते मेडिकल लीव्हवर होते. आजारपणामुळेच त्यांनी आयुष्य संपवलं असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु शवविच्छेदन अहवालातूनच खरं कारण समोर येईल. हिमांशू रॉय यांनी 2013 मधील आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अनेक अटकसत्र केलं होतं. त्यांनीच विंदू दारासिंहला बेड्या ठोकल्या होत्या. याशिवाय अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीही हिमांशू रॉय यांच्याच नेतृत्त्वात झाली होती. कॅन्सरवर मात, नैराश्याने हरवलं पिळदार शरीरयष्टी असलेल्या हिमांशू रॉय यांची प्रकृती कॅन्सरमुळे खालावली होती. अशा परिस्थितीती आपल्याला कोणी पाहू नये, असं त्यांना वाटत होतं. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली होती. कॅन्सरवर मात करुन पुन्हा वर्दीमध्ये ड्यूटी जॉईन करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु याचदरम्यान, त्यांना नैराश्येने ग्रासलं. त्याच डिप्रेशनमधून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. संबंधित बातम्या जेव्हा रॉय यांनी कसाबला गुपचूप पुण्याला नेलं होतं!   हिमांशू रॉय घोड्यावरुन पडले तेव्हाच घात झाला!   डॅशिंग हिमांशू रॉय यांचा अल्पपरिचय 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil : आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला पद मिळालं तर सोडून गेलेले सर्व परत येतील; हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला पद मिळालं तर सोडून गेलेले सर्व परत येतील; हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
भरत गोगावले म्हणतात, पालकमंत्री किस बात की चीज; आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा वाद
भरत गोगावले म्हणतात, पालकमंत्री किस बात की चीज; आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा वाद
मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती; दोघांचे नावही घेतले
मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती; दोघांचे नावही घेतले
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियानं नियम बदलला, आता 'या' व्यवहारांसाठी खातेदारांना पैसे मोजावे लागणार, 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी
स्टेट बँक ऑफ इंडियानं नियम बदलला, आता 'या' व्यवहारांसाठी खातेदारांना पैसे मोजावे लागणार, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil : आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला पद मिळालं तर सोडून गेलेले सर्व परत येतील; हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला पद मिळालं तर सोडून गेलेले सर्व परत येतील; हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
भरत गोगावले म्हणतात, पालकमंत्री किस बात की चीज; आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा वाद
भरत गोगावले म्हणतात, पालकमंत्री किस बात की चीज; आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा वाद
मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती; दोघांचे नावही घेतले
मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती; दोघांचे नावही घेतले
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियानं नियम बदलला, आता 'या' व्यवहारांसाठी खातेदारांना पैसे मोजावे लागणार, 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी
स्टेट बँक ऑफ इंडियानं नियम बदलला, आता 'या' व्यवहारांसाठी खातेदारांना पैसे मोजावे लागणार, जाणून घ्या सविस्तर
जमिनीच्या वादाचा वचपा काढला; धाराशिवमध्ये भररस्त्यात पती पत्नीला संपवलं, थरारक घटनेनं जिल्हा हादरला
जमिनीच्या वादाचा वचपा काढला; धाराशिवमध्ये भररस्त्यात पती पत्नीला संपवलं, थरारक घटनेनं जिल्हा हादरला
माझं मुंबईतील घर राहण्यायोग्य नाही, भाड्यानं घर मिळणंही कठीण; मुंडेंनी सरकारी बंगला न सोडण्याचं दिलं कारण
माझं मुंबईतील घर राहण्यायोग्य नाही, भाड्यानं घर मिळणंही कठीण; मुंडेंनी सरकारी बंगला न सोडण्याचं दिलं कारण
Chandrababu Naidu News: रेवंथ रेड्डींच्या हाॅटलाईनवरून चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; माजी मुख्यमंत्र्यांचा सनसनाटी दावा!
रेवंथ रेड्डींच्या हाॅटलाईनवरून चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; माजी मुख्यमंत्र्यांचा सनसनाटी दावा!
लालबागचा राजा परिसरात अग्निशमन बंबास दिवसाला सव्वा लाख भाडे, बैठकीत मुद्दा; मुख्यमंत्र्यांकडून कमी करण्याचं आश्वासन
लालबागचा राजा परिसरात अग्निशमन बंबास दिवसाला सव्वा लाख भाडे, बैठकीत मुद्दा; मुख्यमंत्र्यांकडून कमी करण्याचं आश्वासन
Embed widget