एक्स्प्लोर
नवी मुंबईत शाळेचा गेट अंगावर पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू
कोपरखैरणेमधील महापालिकेची ही शाळा आहे. शाळेचं काम सुरु असून शाळेच्या आवारात ही मुलं खेळत असताना ही घटना घडली.
नवी मुंबई : शाळेचा गेट पडून एका मुलाचा मृत्यू आणि एक मुलगा जखमी झाल्याची घटना नवी मुंबईत घडली. कोपरखैरणेमधील महापालिकेची ही शाळा आहे. शाळेचं काम सुरु असून शाळेच्या आवारात ही मुलं खेळत असताना ही घटना घडली.
नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर- 11 मध्ये असलेल्या महापालिकेच्या शाळेच्या इमारतीचं काम सुरु आहे. शाळेच्या आवाराला गेट लावलं आहे, मात्र ते गेट लावताना कोणताही खबरदारीचा उपाय घेतला नसल्याचा आरोप होतोय.
मुले शाळेच्या आवारात क्रिकेट खेळत होती. यावेळी बॉल बाहेर जाऊ नये यासाठी मुलांनी गेट लावला. परंतु सौरभ चौधरी या मुलाच्या डोक्यावर आणि निलेश देवरे याच्या पायावर हा गेट पडला. 13 वर्षीय सौरभचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला.
गेटचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. तर या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी केली.
दरम्यान, कोपरखैरणे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement