एक्स्प्लोर
भिवंडीत अपहरण करुन मुलाची दगडाने ठेचून हत्या
बिलाल शकील कुरेशी 28 ऑक्टोबर रोजी विठ्ठलनगर इथल्या वडिलांच्या बीफ दुकानात गेला असता, त्याचं अपहरण झालं होतं.

भिवंडी : भिवंडीमध्ये एका 14 वर्षीय विद्यार्थ्याची अपहरण करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. बिलाल शकील कुरेशी असं या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो भिवंडीतील निजामपुराच्या कुरेशी नगरमध्ये राहतो.
बिलाल शकील कुरेशी 28 ऑक्टोबर रोजी विठ्ठलनगर इथल्या वडिलांच्या बीफ दुकानात गेला असता, त्याचं अपहरण झालं होतं. अपहरणकर्त्यांनी कुटुंबीयांकडे पाच लाखांची खंडणी मागितली. शिवाय पोलिसात तक्रार केली असता मुलगा जिवंत मिळणार नाही, अशी धमकीही अपहरणकर्त्याने फोनवर दिली होती. मात्र कुटुंबियांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रारदार दाखल केली. पण आज त्याचा मृतदेह मुंबई-नाशिक हायवेलगतच्या ओवली गावाच्या हद्दीत पाईपलाईनच्या अडगळीत सापडला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण झालेला मुलगा वडिलांच्या बीफच्या दुकानातून घरी जाण्यासाठी निघाला, मात्र घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरु केली. रात्री उशिरापर्यंत मुलगा न सापडल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी कुटुंब जाणार, तेवढ्यात अपहरणकर्त्याचा फोन आला आणि त्याने मुलाच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. शिवाय रक्कम न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकीही दिली.
मात्र कुटुंबीयांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर मुलाचा शोध सुरु होता. मात्र आज त्याचा मृतदेह मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या ओवली गावाच्या हद्दीत असलेल्या पाईपलाईनच्या बाजूला झाडी-झुडपात आढळली. अपहरणकर्त्यांनी सर्वात आधी मुलाचा गळा आवळून हत्या केली, त्यानंतर ओळख पटू नये म्हणून मुलाचा डोक्यावर दगडाने ठेवल्याची धक्कादायक घटना भिवंडीत समोर आली आहे
सूत्रांच्या माहितीनुसार, वडिलांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने, त्याच्या दोन साथीदारांसह मुलाची हत्या केल्याची कबुली, ताब्यात असलेल्या आरोपीने दिली आहे. या घटनेने कुरेशी कुटुंबीय भेदरलेलं असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
