एक्स्प्लोर

आरे बचाव घोषणेमागे काहींचे छुपे मनसुबे, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप

मुंबईतल्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेड नेण्यावरुन बराच गदारोळ सुरु आहे. आरेतली वृक्षतोड थांबवण्यासाठी आरे बचावची मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र, आरे बचावच्या घोषणांमागे आणखीही काही मनसुबे लपले आहेत, असा आरोप खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुंबई : मुंबईतल्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेड नेण्यावरुन बराच गदारोळ सुरु आहे. आरेतली वृक्षतोड थांबवण्यासाठी आरे बचावची मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र, आरे बचावच्या घोषणांमागे आणखीही काही मनसुबे लपले आहेत, असा आरोप खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा आरोप नेमका का केला? आणि आरे बचावच्या घोषणांमागे खरोखरच फक्त पर्यावरणाविषयीची तळमळ आहे की कुणाचं खासगी हित साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचा शोध घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाच्या टीमने केला. त्यामध्ये या मोहीमेविषयीचे विविध पैलू समोर आले. आरे वाचवाच्या हाकेला ओ देण्यासाठी दर रविवारी आरे कॉलनीत अनेक मुंबईकर एकत्र येतात. मुंबईतली वनसंपदा जिवंत रहावी हा उद्देश घेऊन अनेक शाळकरी मुलं, तरुण-तरुणी आणि वयस्कर आजी-आजोबाही या आरे बचावच्या दिंडीत सामिल होतात. परंतु मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्यामुळे ज्यांनी आरे बचावचा नारा दिला आहे, त्या स्वयंसेवी संघटनांच्या उद्देशावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आरे वसाहतीत मेट्रो कारशेड तयार करण्याच्या निर्णयाआधी इतर पर्यायी जागांचीही चाचपणी करण्यात आली. यावेळी, अनेक संघटनांकडून पर्यायी जागा सुचवण्यात आल्या. राज्य सरकारकडे या सूचनांचे अनेक मेलही दाखल झाले आणि धक्कादायक म्हणजे आरेतल्या मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या अनेक संघटनांनी एकाच वेळी सरकारला एकाच पर्यायी जागेचा आग्रह धरला. ती जागा म्हणजे आताच्या प्रस्तावित कारशेडच्या जागेपासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर असणारी आरेतील रॉयल पाल्म येथील खासगी विकासकाची जागा. जर, खरंच आरेतील झाडं वाचवण्यासाठी मेट्रो कारशेडला विरोध होत असेल तर त्याच कारशेडसाठी आरेतीलच रॉयल पाल्मची पर्यायी जागा का सुचवली जात आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. आरेतील रॉयल पाल्मच्या जागेत वाढीव एफएसआयच्या बदल्यात मेट्रो कारशेडसाठी जागा ऑफर करणाऱ्या खासगी विकासकांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया मिळाली नाही. याआधी आरे परिसरात रॉयल पाल्म या खासगी विकासकाच्या प्रकल्पाला मंजूरी दिली गेली तेव्हाही हजारो झाडं तोडली गेली. आदीवासींना दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत. महत्त्वाचं म्हणजे आता आरेतल्या मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्याच सत्ताकाळात आरेत हा प्रकल्प उभा राहिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांनुसार जर आरे बचावच्या या घोषणांमागे कुणाचं हित साध्य करण्याचा प्रयत्न होत असेल तर ही मुंबईतल्या पर्यावरणप्रेमींचीच मोठी फसवणूक ठरेल. त्यामुळे, पर्यावरणप्रेमाच्या हिरव्या रंगाखाली काही काळंबेरंही दडलंय का? हे तपासून पहाणं गरजेचं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी

व्हिडीओ

NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे
Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
Embed widget