एक्स्प्लोर
संजय राऊतांच्या रोखठोक प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची दिलखुलास उत्तरं
शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक आगळावेगळा सामना रंगणार आहे. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज (मंगळवार) एक आगळावेगळा सामना पाहायला मिळाला. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊतांच्या रोखठोक प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनीही तेवढ्याच दिलखुलासपणे उत्तरं दिलं.
LIVE UPDATE :
LIVE : मी मुलाखत पाहिली नाही. पण तुम्ही सवतीप्रमाणे वागला नसता तर आम्हाला त्यांना घेण्याची वेळ आली नसती. : मुख्यमंत्री
LIVE : युती झाली तर एनडीएमधून बाहेर पडेन असं नारायण राणे एका मुलाखतीत म्हणाले : संजय राऊत
LIVE : मी मुख्यमंत्री होईन असं मला कधी वाटत नव्हतं, मी या पक्षाचा सैनिक आहे. मला जी जबाबदारी आहे ती पार पाडीन. पक्ष बोलला नागपूरला जा, घरी बस तर घरी बसेन. : मुख्यमंत्री
LIVE : आपली दिल्लीत जायची इच्छा आहे का : संजय राऊत
LIVE : माध्यमांना काहीही वाटू द्या, टीका करु द्या. देशातील जनता मोदींजींच्या मागे आहे. भाजप, एनडीए सत्तेत येईल अधिक जागांवर निवडून येतील : मुख्यमंत्री
LIVE : 2019 बाबत तुम्हााला काय वाटतं? : संजय राऊत
LIVE : भाजपमध्ये गुन्हेगार आले अस मी मानत नाही, पण भाजपसह सर्व पक्षानी आत्मचिंतन केलं पाहिजे. राजकारणातील गुन्हेगारी कमी झाली पाहिजे : मुख्यमंत्री
LIVE : भाजप सत्तेत आल्यापासून दुसऱ्या पक्षातून नेत्यांना घेऊन शुद्धीकरण करून घेतलं. हे तुम्हांला पटत का? : संजय राऊत
LIVE : राज्याची मोठी अडचण की मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री पद नव्हतं, आर. आर.पाटील स्वतः मला म्हणाले होते मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री पद असायला हवे : मुख्यमंत्री
LIVE : नगर मध्ये दोन खून झाले, काही आमदारांना अटक झाली, महाराष्ट्राला गृहमंत्री आहे का? : संजय राऊत
LIVE : परिवर्तन एका दिवसात होत नाही, महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात जास्त उत्पादन गेल्यावर्षी झालं : मुख्यमंत्री
LIVE : तुमच्या काळात शेतकरी संपावर गेले, दाखवतो तसं चित्र नाही : संजय राऊत
LIVE : बाळासाहेब असते तर रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात द्यायला आवडलं असतं. भाजपमध्ये रिमोट कंट्रोल कुणाकडे नसतो. मोदींकडे रिमोट कंट्रोल नाही, अमित शहा यांनी पण कधीही हे करा किंवा करु नका असा फोन केला नाही. स्वातंत्र्य आहे : मुख्यमंत्री
LIVE : शिवसेनेच्या मनातला जागेचा आकडा मला माहित आहे. आपण आकड्याच्या राजकारणात अडकत नाही : मुख्यमंत्री
LIVE : 2014 साली शिवसेनेला 151 जागा लढवायच्या होत्या, आम्ही 147 द्यायला तयार होत्या. युती झाली असती तर बहुमत मिळालं असतं आणि राऊतजी तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री झाला असता : मुख्यमंत्री
LIVE : मला वाटलं नाही की, मी कधी मुख्यमंत्री होईन : मुख्यमंत्री
LIVE : कथाकथित सेक्युलरवादी एकत्र आल्यानंतर बाळासाहेबांच्या विचाराने चालणारी शिवसेना आणि भाजपची युती होईल : मुख्यमंत्री
LIVE : युती होईलच हे तुम्ही ठामपणे कसं काय सांगू शकता? : संजय राऊत
LIVE : जे बोलतो ते खरं मानू नका : मुख्यमंत्री
LIVE : तुम्ही सामना वाचत नाही, असं तुम्ही नेहमी म्हणता : संजय राऊत
LIVE : ही फ्रेंडली मॅच असली तरीही, कुठेही बॉल टेम्परिंग झालेलं नाही : संजय राऊत
LIVE : हा 'सामना' नाही, हे आधीच सांगून टाका राऊतजी... : मुख्यमंत्री
-----------
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर प्रथमच संजय राऊत यांनी ठाकरे कुटुंबाबाहेरच्या राजकीय नेत्याची मुलाखत घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनीही पहिल्यांदाच एखाद्या शिवसेना नेत्याला जाहीर मंचावर प्रकट मुलाखत दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement