एक्स्प्लोर

'दानव्यांचा नवा डंख!', शिवसेनेचा 'सामना'तून रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल

मुंबई: 'कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असा लेखी प्रस्ताव द्या.' अशी अजब मागणी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर शिवसेनेनं 'सामना'तून हल्लाबोल केला आहे. 'दानव्यांचा नवा डंख!' अशा मथळ्याखाली सामनात आज (बुधवार) दानवेंविरुद्ध अग्रलेख छापण्यात आला आहे. दानवेंनी केलेल्या अजब मागणीवर शिवसेनेनं बरंच तोंडसुख घेतलं आहे. 'दानवे यांच्या जिभेने मुख्यमंत्र्यांना ‘डंख’ मारण्याचे जे उद्योग आरंभले आहेत त्यामागे त्यांचा बोलविता धनी कुणी दुसराच तर नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही.' असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चुचकारलं आहे. काय होतं नेमकं प्रकरण? कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिर्डीत केलं होतं. दानवे म्हणाले, “कर्ज माफ करुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत असतील, तर यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं, राजकीय जोडे बाहेर काढावे, आणि या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, अशाप्रकारचा ठोस प्रस्ताव द्यावा, मग त्यावर सरकार विचार करेल” याशिवाय “आमच्यावर काय आरोप होत आहेत, याची आम्हाला चिंता नाही. आमचं लक्ष पायाभूत सुविधांवर आहे”, असंही दानवेंनी नमूद केलं. एक नजर 'सामना'च्या अग्रलेखावर: * सरसकट कर्जमाफीने अर्थव्यवस्था कोलमडेल वगैरे विचार ठीक आहेत, पण जनताच जिवंत राहिली नाही तर तुमच्या त्या अर्थव्यवस्थेस काय पालखीत बसवून मिरवायचे आहे? दानवे यांच्यासारखे पुढारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात विरोधी पक्षाकडे ‘हमी’ मागतात हा तर चेष्टेखोरीचा कळसच झाला. * तोंडावर लगाम ठेवा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी करूनही भाजप पुढाऱ्यांच्या जिभांचे तडतडणे सुरूच आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिभेचे काय करायचे, असा प्रश्न आता मुख्यमंत्री फडणवीस यांनाही पडलाच असेल. रावसाहेब दानव्यांनी आता शेतकऱयांच्या दुःखावर डागण्या देत सांगितले आहे की, कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची लेखी हमी द्या. दानवे यांच्या नव्या तोंडपट्टय़ांमुळे सरकारवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले. दानवे यांच्या जिभेने मुख्यमंत्र्यांना ‘डंख’ मारण्याचे जे उद्योग आरंभले आहेत त्यामागे त्यांचा बोलविता धनी कुणी दुसराच तर नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. शेतकरी जगवण्यासाठी सरकारने आकाशपाताळ एक करायला हवे. महाराष्ट्र राज्य हे शेतकऱयांच्या आयुष्याचे स्मशान झाले आहे व गेल्या दोन वर्षांतच चारेक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात हे काही आमच्या राज्याला भूषणावह नाही. * या भयंकर दुष्टचक्रातून सुटण्यासाठी तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असेल तर ते मायबाप सरकारचेच अपयश आहे. शेतकरी कर्जाच्या अजगरी विळख्यात सापडला आहे. हा विळखा दूर करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांत नसेल तर त्यांनी शेतकऱ्यांचे हे असे धिंडवडे तरी काढू नयेत. बरं, दानवे महाशय हे बोलले कुठे, तर साईबाबांच्या शिर्डीत. वास्तविक दर्शनानंतर साईबाबांचा ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा मंत्र घेऊनच भाविक शिर्डीतून बाहेर पडतात. तथापि, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नेमका हाच मंत्र विसरले. दानवेंनी शिर्डीत जे वक्तव्य केले त्यातून शेतकऱ्यांबद्दल त्यांना किती ‘श्रद्धा’ आहे हे तर समजलेच; शिवाय कसे बोलावे याचे भान सोडून त्यांनी ‘सबुरी’चेही धिंडवडेच काढले. * अर्थात, अशा तऱ्हेने बोलण्याची रावसाहेबांची ही काही पहिलीच वेळ नाही. ‘निवडणुकीच्या एक दिवस अगोदर लक्ष्मीदर्शन होत असते. अशी लक्ष्मी घरी आली तर परत करू नका, तिचे स्वागत करा’, असे आवाहनच दानवे महाशयांनी नगरपालिका निवडणुकीच्या वेळी मतदारांना केले होते. आता मात्र शेतकरी आत्महत्यांच्या संवेदनशील विषयावरून ते विरोधकांवर घसरले आहेत. खरे तर कर्जमाफी हा कायमचा तोडगा नसून शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी केलेली तातडीची मलमपट्टी आहे. * आज जो उठतोय तो आमच्या शेतकरी बांधवांची चेष्टाच करतोय. शेतकऱयांची मते हवीच आहेत, पण त्यांना मरताना पाणी पाजायला पुढे जायचे नाही, उलट पाणी पाजले तरी तो मरणारच नाही याची गॅरंटी काय? असे मूर्खपणाचे सवाल केले जात आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनीही कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडास पानेच पुसली आहेत. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची हमी काय? या प्रश्नाच्या दोरीवर तेदेखील उड्या मारीत आहेत. शेतकऱयांच्या गळ्य़ाभोवती लागलेला फास सोडवायला मात्र कोणीच पुढे येत नाही. महाराष्ट्राचे दुर्दैव, दुसरे काय म्हणायचे! संंबंधित बातम्या: कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबतील हे लेखी द्या : दानवे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget