एक्स्प्लोर

‘गोहत्या नको, शेतकरी आत्महत्या चालते!’, ‘सामना’तून सरकारवर टीका

मुंबई: शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून आज पुन्हा शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मधून सरकारवर टीका करण्यात आली आहे. गोहत्याबंदी पाप असेल तर शेतकरी आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे. त्यामुळे कोणावर गुन्हे दाखल करायचे याचा खुलासा करावा अशी मागणी ‘सामना’मधून करण्यात आली आहे. सामनातील अग्रेलखातून आतापर्यंत कायम भाजपवर टीका करण्यात आली आहे. सेनेनं आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता या टीकेला भाजप नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं आहे. एक नजर ‘सामना’च्या अग्रलेखावर: गोहत्या नको, शेतकरी आत्महत्या चालते! गोहत्येचे ज्यांना पातक वाटते त्यांचे आम्ही अभिनंदन करतो, पण त्यांच्या राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहे त्याचे काय? अशावेळी शेतकरी आत्महत्या हा सदोष मनुष्यवध मानून कुणाला गुन्हेगार ठरवायचे, कुणाला जन्मठेप ठोठवायची आणि कुणाला फासावर लटकवायचे याबाबत खुलासे व्हायलाच हवेत! गाय मारणाऱ्यांना उलटे लटकवून फाशी देऊ असे विधान छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी केले आहे. गुजरातमध्ये गोहत्या करणाऱ्यांना यापुढे जन्मठेपेची शिक्षाच भोगावी लागेल. गोमांसाची विक्री वा देवाणघेवाण करणाऱ्यांना ७ ते १० वर्षांच्या सक्तमजुरीची आणि १ ते ५ लाख रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद गुजरात सरकारच्या नव्या कायद्यात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये गोहत्या करणाऱ्यांचे हातपाय तोडू असे भाजप आमदारांनी जाहीर केले आहे. गाईविषयी संपूर्ण हिंदू समाजाला एक ममत्व आहे, गाईला गोमातेचा दर्जा हिंदू समाजाने दिला आहे. ही आपली श्रद्धा असली तरी देशातील एका मोठ्या वर्गाचे अन्न हे गोमांस आहे. गोव्यात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे, पण तेथील मोठा समाज ‘बीफ’ खातो. गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून फाशी देण्याची भूमिका गोव्याचे मुख्यमंत्री श्री. पर्रीकर घेऊ शकतील काय? बरं, तिकडे केरळमध्येदेखील पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने तर ‘‘भाजपला मत दिले तर ‘बीफ’चा मुबलक पुरवठा मतदारसंघात राहण्याबाबत काळजी घेऊ’’, असे आश्वासन दिले आहे. केरळमधील मल्लापूरम लोकसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपतर्फे एन. श्रीप्रकाश हे तेथे निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना गोमांसासंदर्भात हे ‘खळबळजनक’ विधान केले. महाराष्ट्रासारख्या राज्यांमधील शेतकऱ्यांची अवस्था इतकी दारुण व करुण झाली आहे की, स्वतःचे पोट भरायचे की पशुधन जगवायचे या विवंचनेत महाराष्ट्राचा शेतकरी आहे. भाकड गोवंशाचे काय करायचे याचेही व्यवहारी उत्तर मिळायलाच हवे. आम्ही त्यावर इतकेच सांगू शकतो की, शेतकऱ्यांचे भाकड पशुधन सरकारने विकत घेऊन त्यांच्यासाठी चारा छावण्या स्थापन करायला आमची हरकत नाही. गोवंशहत्या रोखायची असेल तर शेतकऱ्यांना जगवायला हवे, त्याला आर्थिकदृष्ट्या स्वाभिमानी व मजबूत करायला हवे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळीGhatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
Embed widget