एक्स्प्लोर
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मुंबई महापालिकेची नियमावली
मुंबईत एकूण दहा हजार 700 नोंदणीकृत गणेशमंडळे आहेत.

मुंबई : अवघ्या सव्वा महिन्यात गणपती बाप्पांचं आगमन होणार असल्याने गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मंडळं सज्ज झाली आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मुंबई महापालिकेने नियम आखून दिले आहेत. मुंबईत एकूण दहा हजार 700 नोंदणीकृत गणेशमंडळे आहेत. गणेशोत्सव मंडळांना बीएमसीचे नियम 1. मंडपाच्या बाजूला 10 फूट अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पादचारी यांच्यासाठी जागा सोडावी 2. गणपती मंडपासाठी बीएमसी, पोलिस, वाहतूक विभाग, अग्निशमन दल यांचा परवाना घेणे आवश्यक 3. मंडपात फायर रेझिस्टंट सिस्टम असावी 4. मंडपाच्या बाहेर मंडपाच्या नकाशाचा आराखडा असणे आवश्यक 5. मंडपापासून 100 मीटर दूर भक्तांच्या गाड्यांचं पार्किंग 6. खड्डे जर खणले तर गणेशविसर्जनानंतर 10 दिवसांत बुजवले पाहिजेत. त्याचे फोटो महापालिकेला पाठवावे.
बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा, मंडळांना राज ठाकरेंचा सल्ला
गणेशोत्सव मंडळांची मागणी 1. गणेशोत्सवासाठी दहा दिवस ध्वनिक्षेपकाची परवानगी रात्री 12 पर्यंत असावी. 2. 60 डेसीबल पर्यंत आवाजाच्या परवानगीत वाढ होण्यासाठी ध्वनीप्रदूषण कायदा कलम 4 मध्ये बदल करावेत. सध्या 40-45 डेसिबल पर्यंत परवानगी आहे. 3. सायलेंस झोन मधील गणेश मंडळांना ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी द्यावी. 4. मुंबई मेट्रोचे काम सुरु असलेल्या रस्त्यावरुन आगमन-विसर्जन मिरवणुकीसाठी पर्यायी रस्ता द्यावा.आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
महाराष्ट्र






















